सासवडहून पुण्याकडे येणाऱ्या एका लक्झरी बसचा बोपदेव घाटाजवळ अपघात झाल्याने १० प्रवासी जखमी झाले आहेत. बोपदेव घाटाजवळ लक्झरी बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची माहिती आहे. ब्रेक फेल झाल्याने गाडीवर नियंत्रण मिळवताना बस उलटून हा अपघात झाला यामध्ये १० प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,सासवडहून पुण्याकडे येत असताना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास लक्झरी बसचा ब्रेक फेल झाल्याची घटना घडली.या घटनेत १० नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेमुळे काही काळ मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत झाली.