News Flash

खासगी लसीकरण बंदच

मुंबईत सरकार आणि पालिकेची ४९, तर खासगी रुग्णालयात ७१ लसीकरण केंद्र आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईसाठी ‘कोविशिल्ड’च्या ९९ हजार मात्रा

मुंबई : राज्य शासनाने मुंबई महापालिकेला कोविशिल्ड लसीच्या ९९ हजार मात्र शनिवारी उपलब्ध करून दिल्या असून त्यापैकी ४९ हजार मात्रा शासकीय आणि पालिकेच्या रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शनिवारी पुन्हा एकदा मुंबईतील काही केंद्रांवर लसीकरण सुरू झाले . मात्र, अद्यापही लसीचा पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यामुळे खासगी रुग्णालयांमधील ७१ केंद्रांतील लसीकरण तूर्तास बंदच ठेवावे लागणार आहे.
मुंबईत सरकार आणि पालिकेची ४९, तर खासगी रुग्णालयात ७१ लसीकरण केंद्र आहेत. मात्र, लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे खासगी रुग्णालयांच्या केंद्रातील लसीकरण १०, ११ आणि १२ एप्रिल रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर सरकारी आणि पालिका रुग्णालयांतील लसीकरण केंद्रात १० एप्रिल रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६, तर ११ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पालिकेला ९९ हजार मात्रा उपलब्ध झाल्यामुळे शनिवार केंद्रावर लसीकरण पार पडले. हा साठा दोन दिवसांसाठी पुरेसा आहे. उपलब्ध साठा लक्षात घेता रविवारीही लसीकरण सुरळीत होईल, असे पालिकेच्या अधिका-यांनी सांगितले. लसीच्या मात्रांचा मोठा साठा उपलब्ध झाल्यास खासगी रुग्णालयांतील केंद्रातही लसीकरण मोहीम सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे.
शासनाने पालिकेला कोविशिल्डच्या ९९ हजार मात्रा शनिवारी दिल्या. त्यापैकी ३३ हजार मात्रा पालिकेच्या, तर १६ हजार मात्रा शासकीय रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांना तात्काळ उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. दर दिवशी ७५ हजार नागरिकांना लस देता येऊ शकेल. परंतु यासाठी पालिकेकडे पाच लाख मात्रांचा साठा उपलब्ध असायला हवा. – सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2021 2:00 am

Web Title: private vaccination closed akp 94
Next Stories
1 “महाविकासआघाडी सरकारने करोनाच्या काळात महाराष्ट्राची परिस्थिती अधिक बिघडविली”
2 वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलाव्यात का? – सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली चिंता
3 संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Just Now!
X