पूर्ण नाव – रावसाहेब रामराव ऊर्फ आर. आर. पाटील
जन्म – १६ ऑगस्ट १९५७
जन्मगाव – अंजनी, ता. तासगाव, जि. सांगली
शिक्षण – बी.ए., एल.एल.बी.
प्रवास – आर. आर. पाटील १९७९ मध्ये सांगली जिल्ह्यातील सावळजमधून जिल्हा परिषदेवर निवडून गेले. १९७९ ते ९० या काळात त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले. १९९० मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडले गेले. त्यानंतर सातत्याने १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ या सर्व निवडणुकांमध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. विधानसभेमध्ये सुरुवातीच्या काळात त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून काम पाहिले. त्याचबरोबर १९९६-९७ आणि १९९८-९९ या काळात त्यांनी विधीमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्षस्थानही भूषविले. १९९९ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
एक नोव्हेंबर २००४ रोजी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २००३ ते २००८ आणि २००९ ते २०१४ या काळात त्यांनी राज्याचे गृहमंत्री म्हणूनही काम सांभाळले. आर. आर. पाटील यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले होते. या काळात त्यांनी जिल्ह्यामध्ये विविध विकासकामे करून नक्षलग्रस्त भागातील ग्रामस्थांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले. गृहमंत्री म्हणून काम करताना त्यांनी राज्यातील डान्सबार बंदीचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे विविध सामाजिक स्तरांतून स्वागत करण्यात आले होते.
बडें बडें शहरों में…
मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना आर. आर. पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ‘बडें बडें शहरों मे, छोटी छोटी घटनाए होती रहती है…’ असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
Arvind Kejriwal
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २३ एप्रिलपर्यंत वाढ
RKS bhadauria joins BJP
राज्यपाल, न्यायाधीश यानंतर आता हवाई दलाचे माजी प्रमुख आरकेएस भदौरिया यांचा भाजपात प्रवेश
election commission arrest cm
केजरीवाल, लालू ते जयललिता; आतापर्यंत ‘या’ ५ मुख्यमंत्र्यांना ईडीकडून अटक