News Flash

हवेतून प्राणवायू निर्मितीचा आयुर्वेद महाविद्यालयात प्रकल्प

आयुर्वेद महाविद्यालयात आ. संग्राम जगताप व जय आनंद फाउंडेशनच्या सहकार्यातून हवेतून प्राणवायू निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

हवेतून प्राणवायू निर्मितीचा आयुर्वेद महाविद्यालयात प्रकल्प
शहरातील आयुर्वेद महाविद्यालयात हवेतून प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारण्याच्या कामाची सुरुवात आ. अरुण जगताप यांच्या हस्ते करण्यात आली.

नगर : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमी वर शहरातील आयुर्वेद महाविद्यालयात हवेतून प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारणीच्या कामास आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते आज, सोमवारी सुरुवात करण्यात आली. येत्या दोन दिवसांत हा प्रकल्प  कार्यान्वित होऊन रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा केला जाईल, असे  आ. जगताप यांनी सांगितले.

आयुर्वेद महाविद्यालयात आ. संग्राम जगताप व जय आनंद फाउंडेशनच्या सहकार्यातून हवेतून प्राणवायू निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. संस्थेचे संचालक डॉ. विजय भांडरी, बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोथरा, नगरसेवक विपुल शेटीया, कमलेश भंडारी, शिवा कराळे, सनफार्मा कंपनीचे सरव्यवस्थापक अविनाश पापडे, वरिष्ठ व्यवस्थापक अतुल सुतार, अमोल धाडगे, घनश्याम सरडे, प्रवीण गाडेकर, रितेश परक, मिनेश छाजेड, वैभव मेहर, अमित वर्मा, प्रशांत मुथा आदी उपस्थित होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 1:49 am

Web Title: project produce oxygen air in ayurveda college ssh 93
Next Stories
1 केंद्र सरकारविरुद्ध जालन्यात काँग्रेसची निदर्शने
2 केंद्र सरकारकडून दोन महिन्यासाठी गहू-तांदूळ मोफत
3 चंद्रपुरात पाण्यासाठी आंदोलन
Just Now!
X