News Flash

पदोन्नती आरक्षण रद्द : राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक ठरणार वादळी?

“ नितीन राऊत यांनी जाहीरपणे वक्तव्य करणं योग्य नाही ” असं म्हणत नवाब मलिकांनी व्यक्त केली नाराजी!

संग्रहीत छायाचित्र

पदोन्नती आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयानंतर महाविकासआघाडी सरकारमध्ये मतभेद झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक चांगलीच गाजणार असल्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेस नेते व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आजच्या बैठकीत काँग्रेसकडून या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.

आरक्षणातील पदोन्नतीच्या विषयावरून शिवसेना व राष्ट्रवादी संयमी भूमिका घेत असताना काँग्रेसमधील नेत्यांचा एक गट आक्रमक झाला आहे. त्यावरून वाद सुरू आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याचे पडसाद पडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

पदोन्नतीमधील आरक्षणावरून राजकारण तापले

“आज राज्यमंत्री मंडळाची बैठक आहे. तत्पूर्वी आमची पक्षाची बैठक होईल, या बैठकीत जे काही निर्णय होतील, त्यानुसार राज्य मंत्रिमंडळात हा विषय आणला जाईल. आमचा प्रयत्न राहणार आहे की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्या अगोदर या विषयावर चर्चा झाली पाहिजे आणि ७ मे चा अध्यादेश रद्द झाला पाहिजे, ही भूमिका आमच्या पक्षाने घेतलेली आहे. कॅबिनटेची बैठक होऊ द्या मग तुम्हाला कळेल डॉ. नितीन राऊत काय करतात?” असं नितीन राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.

पदोन्नती आरक्षण : नेमका वाद काय? कधीपासून दिलं गेलं हे आरक्षण? कायदा काय सांगतो? जाणून घ्या!

दरम्यान, पदोन्नती आरक्षणाच्या मुद्यारून नितीन राऊत यांनी जाहीर वक्तव्य करणं योग्य नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयात काँग्रेसचे मंत्री सहभागी आहेत, तर तीन पक्षांचं सरकार असताना जाहीर वक्तव्य करण्यापेक्षा समन्वय समिती समोर भूमिका मांडावी असा सल्ला देखील नवाब मलिक यांनी दिला आहे.

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्यास स्थगिती नाही

“ज्या पद्धतीने नितीन राऊत सार्वजनिक विधानं करत आहेत, ते योग्य नाही. जे काही विषय असतील त्याबाबत कॅबिनेट बैठकीत चर्चा केली पाहिजे. पण मी एवढंच बोलू इच्छितो की, पदोन्नती आरक्षणाबाबत नितीन राऊत हे पाठपुरावा करत होते. वेळोवेळी त्यांचं म्हणणं होतं, जरी आरक्षणाच्या आधारावर लोकांना पदोन्नती देता येत नसेल, न्यायालयात विषय प्रलंबित असेल, जनरलमध्ये लोकांना पदोन्नती कशी देता येईल याबाबतीत ते आग्रही होते. तेच पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यासोबत बोलत होते. जे काही निर्णय झाले असतील त्यात ते सहभागी आहेत. आता वेगळी काही भूमिका घेत असतील तर तो त्यांचा विषय आहे. पण प्रत्येक विषय हे समन्वय समितीसोबत बसूनच चर्चा केली पाहिजे.” असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

पदोन्नती आरक्षण रद्द : अध्यादेश काढताना आम्हाला विचारलं गेलं नाही, म्हणून आता…. – नाना पटोले

राज्यातील शासकीय आणि निमशासकीय सेवेमधल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू असलेलं पदोन्नतीमधील आरक्षण राज्य सरकारने ७ मे रोजी अध्यादेश काढून रद्द ठरवलं आहे. मात्र, काँग्रेसनं या निर्णयाला तीव्र विरोध केला असून तो तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी वेळ मागितली असून, या चर्चेनंतरच काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच, या संदर्भातील अध्याधेश काढताना आम्हाला विचारलं गेलं नाही, असं देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 12:48 pm

Web Title: promotion reservation cancelled will be todays meeting of the state cabinet be stormy msr 87
Next Stories
1 जशास तसं! मुक्ताईनगरचा वचपा काढला माथेरानमध्ये; शिवसेनेच्या १० नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
2 भाजपाने किती सन्मान दिला, हे संभाजीराजे सांगत नाहीयेत -चंद्रकांत पाटील
3 जळगावमध्ये शिवसेनेने धक्का दिल्यानंतर खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Just Now!
X