04 March 2021

News Flash

उदयनराजे भोसले यांचा प्रचार उद्यापासून

खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराचा नारळ बुधवारी वाढवला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शशिकांत िशदे यांनी पत्रकारांना दिली. या वेळी खा. भोसले यांच्या विरोधात विरोधकांकडून

| March 10, 2014 02:35 am

खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराचा नारळ बुधवारी वाढवला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शशिकांत िशदे यांनी पत्रकारांना दिली. या वेळी खा. भोसले यांच्या विरोधात विरोधकांकडून उमेदवार नसून निवडणूक बिनविरोध झाली तर आनंद आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
खा. भोसले यांच्या प्रचारासाठी येथील राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आणि लोकप्रतिनिधींची नियोजन बठक आयोजित करण्यात आली होती. बठकीनंतर पालकमंत्री िशदे बोलत होते. ते पुढे म्हणाले, सातारा येथील शिवरायांच्या पुतळ्यापासून कराड येथील शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत, तसेच स्व. यशवंतराव चव्हाणांच्या स्मृती स्थळापर्यंत रॅली काढली जाणार आहे. गावोगावी आघाडीच्यावतीने संयुक्त प्रचार मेळावे घेतले जाणार आहेत.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी खा. भोसले यांची उमेदवारी घोषित केली आहे. सर्व मतभेद विसरुन आम्ही ऐतिहासिक विजय मिळवू, असे सांगून आप किंवा महायुतीच्या उमेदवारांची काळजी करण्यासारखी कोणतीच परिस्थिती नाही. तसेच जिल्ह्यातले सर्व आमदार आणि प्रमुख कार्यकत्रे या मोहिमेत सहभागी झाले असल्याने आमचा ऐतिहासिक विजय नक्की आहे, असेही िशदे म्हणाले.
दरम्यान, वाई येथे झालेल्या मेळाव्यात पुरुषोत्तम जाधव यांनी आरपीआय मधून मात्र धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्याचे आम्ही ठरवले आहे. महायुतीतल्या सर्व पक्षांनी माझ्या उमेदवारीला मान्यता दिली आहे. वाई येथे झालेल्या मेळाव्यात यावर शिक्कामोर्तब झाला असून दि. १० रोजी माझ्या नावाची घोषणा व्हावी यासाठी महायुतीचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख कार्यकत्रे खा. आठवले तसेच उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत, असे सांगितले. सातारा येथून आरपीआयचा उमेदवार मराठा समाजातला असावा, अशी अपेक्षा पक्षश्रेष्ठींची आहे. जर तो मिळाला नाही तर इतरांचा विचार केला जाईल, असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2014 2:35 am

Web Title: proneness start tomorrow of udayanraje bhosale
टॅग : Ncp,Satara
Next Stories
1 काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त बैठक नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे लांबणीवर
2 सोलापुरात महिलेची मुलासह विहिरीत उडी टाकून आत्महत्या
3 पीकविम्याचे निकष बदलून गारपीटग्रस्तांना मदत करू – शरद पवार
Just Now!
X