हिंगोली मतदारसंघातील काँगेसचे उमेदवार भाऊ पाटील गोरेगावकर यांची संपत्ती ५ कोटी ४८ लाख, राष्ट्रवादीचे दिलीप चव्हाण यांची ४ कोटी ४५ लाख, भाजपचे तान्हाजी मुटकुळे यांची सुमारे ८५ लाखांची मालमत्ता आहे.
गोरेगावकर यांच्या संपत्तीत ६५ हजारांची ठेव, दागिने, वाहने यातील गुंतवणूक, त्यांच्या नावे ४७ लाख १७ हजार, पत्नीच्या नावे ३० लाख ९७ हजार, तर मुलाच्या नावे १६ लाख १० हजार, गोरेगावकर यांच्या नावे ३ कोटी ३४ लाख स्थावर मालमत्ता, पत्नीच्या नावे १७ लाख ४७ हजारांची, तर मुलाच्या नावे २४ लाखांची संपत्ती आहे. त्यांच्यावर २९.९२ हजारांचे कर्ज आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार चव्हाण यांच्या कुटुंबीयांकडे ३ लाख ३० हजार ५०० रुपये रोकड, ठेवी, वाहने, दागिन्यातील गुंतवणूक, पत्नीची ५ लाख ८५ हजारांची गुंतवणूक आहे. चव्हाण यांच्या नावे ३ कोटी ८५ लाखांची स्थावर मालमत्ता, पत्नीच्या नावे २ लाख ५७ हजारांची, तर मुलाच्या नावे २ लाखांची संपत्ती आहे. १ कोटी ५४ लाखांचे कर्ज असल्याचे शपथपत्रात दर्शविले आहे.
भाजपचे मुटकुळे यांच्या संपत्तीत कुटुंबीयांकडे ३ लाख १० हजार रोकड, त्यांच्या नावे २ लाख ३२ हजार गुंतवणूक, पत्नीच्या नावे १ लाख ३७ हजार, मुलांच्या नावे २ लाख २५ हजार, त्यांच्या नावे २५ लाखांची स्थावर मालमत्ता, पत्नीच्या नावे २५ लाख, तर मुलाच्या नावे २० लाख व मुलीच्या नावे ६ लाखांची गुंतवणूक आहे. मनसेचे ओमप्रकाश कोटकर यांची मालमत्ता १ कोटी ३३ लाखांची आहे. कोटकर यांच्या नावे २ लाख २५ हजारांची रोकड, ३० लाख ८१ हजारांची गुंतवणूक, पत्नीच्या नावे २ लाख ४७ हजार, ९८ लाखांची  स्थावर मालमत्ता, तर १२.७३ लाखांचे कर्ज आहे.