News Flash

उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणे

आमदार असो की आमदारकीची स्वप्ने पाहणारे प्रतिस्पर्धी; उमेदवार जिल्ह्यातील बहुतेक सर्व प्रमुख उमेदवारांची मालमत्ता कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. याचवेळी त्यांची कर्जाची संख्याही काही कोटींमध्ये

| September 28, 2014 02:20 am

आमदार असो की आमदारकीची स्वप्ने पाहणारे प्रतिस्पर्धी; उमेदवार जिल्ह्यातील बहुतेक सर्व प्रमुख उमेदवारांची मालमत्ता कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. याचवेळी त्यांची कर्जाची संख्याही काही कोटींमध्ये पोहोचलेली आहे. मंत्री, आमदार आणि आमदारकीच्या स्पध्रेत उतरलेल्या उमेदवारांनी निवडणूक विभागाकडे सादर केलेल्या आíथक लेखा-जोखामध्ये त्यांचे अर्थकारण दिसून आले आहे. गतवेळच्या निवडणुकीपेक्षा यंदा मालमत्ता चांगलीच फुगल्याचे आकडेवारी सांगत आहे.
जिल्ह्यातील सर्वात धनिक उमेदवार ठरले आहेत ते कोल्हापूर दक्षिणचे कॉँग्रेसचे उमेदवार गृहराज्यमंत्री सतेज पाटील. त्यांची मालमत्ता २३ कोटी ६५ लाख रुपयांची आहे. तर त्यांच्या नावावर ४ कोटी ८ लाखांचे कर्ज आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांची मालमत्ता ६ कोटी ११ लाख रुपये इतकी आहे. त्यांचे कर्ज १ कोटी ६५ लाखांचे आहे.
‘कोल्हापूर उत्तर’मधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे राजेश क्षीरसागर यांची संपत्तीही कोटीच्या घरात पोहोचलेली आहे. १ कोटी ६० लाखांची कर्जे असलेल्या क्षीरसागरांची मालमत्ता ३ कोटी ९५ लाखांची आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष, कोल्हापर उत्तरचे उमेदवार आर. के. पोवार यांचेकडे जडजवाहीर, दागिने, मालकीची दोन घरे आदींची मालमत्ता ४० लाखाची असली तरी विशेष म्हणजे त्यांच्या नावावर कोणतेच वाहन नाही. तर राजकारणात वर्षांनुवष्रे असले तरी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार मात्र मालमत्तेच्या बाबतीत सामान्यांप्रमाणे लाखाच्या घरातच राहिले आहेत. माकपचे रघुनाथ कांबळे यांच्याकडे ३० लाखाची मालमत्ता आहे.
काँग्रेसचे इचलकरंजीचे उमेदवार प्रकाश आवाडे यांचे विरोधक नेहमीच धनशक्ती विरुध्द जनशक्ती अशी हाकाटी पिटत असतात. अशा या उमेदवाराची मालमत्ता प्रत्यक्षात ७ कोटी ८५ लाख रुपये इतकी आहे. तर त्यांच्या अंगावर ३ कोटी रुपयांचे कर्ज आहे. आवाडे यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे आमदार सुरेश हाळवणकर यांची मालमत्ता १.१५ कोटीची असून त्यांना ६२ लाख रुपयांचे कर्ज आहे. जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार के. पी. पाटील यांचीही मालमत्ता कोटीच्या घरात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2014 2:20 am

Web Title: property of candidate in kolhapur
Next Stories
1 कोल्हापुरात सर्वत्र बहुरंगी लढती
2 पंचरंगी लढतींमध्ये उमेदवारांची कसोटी
3 काँग्रेसला टाळून मोदीच लक्ष्य!
Just Now!
X