30 September 2020

News Flash

एलबीटीच्या विरोधात लातूर बंद यशस्वी

स्थानिक संस्थाकर (एलबीटी) विरोधात फेडरेशन असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने राज्यातील २३ महापालिकेच्या हद्दीत १५ व १६ जुलै रोजी बंदची हाक दिली होती. पहिल्या दिवशी लातूर

| July 15, 2013 05:00 am

स्थानिक संस्थाकर (एलबीटी) विरोधात फेडरेशन असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने राज्यातील २३ महापालिकेच्या हद्दीत १५ व १६ जुलै रोजी बंदची हाक दिली होती. पहिल्या दिवशी लातूर महापालिका कार्यक्षेत्रात बंदला व्यापाऱ्यांनी १०० टक्के प्रतिसाद दिला.
गेल्या वर्षभरापासून एलबीटीची तिढा अजून सुटलेला नाही. व्यापाऱ्यांबरोबर सरकार चच्रेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी प्रश्न मात्र अद्याप सुटलेला नाही. एलबीटीऐवजी व्हॅटमध्ये सरसकट एक टक्का वाढ करण्याचा पर्याय व्यापाऱ्यांनी सुचविला. मात्र तो सरकारने फेटाळला.
बंदचे नियोजन व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले. महापालिका हद्दीत एखाद्या गल्लीतील छोटे दुकानही उघडू नये, यासाठीची काळजी घेण्यात आली होती. दोन दिवसांचा बंद हा राजकीय पक्ष अथवा कोणत्या संघटनेने पुकारलेला नसून तो व्यापाऱ्यांनी पुकारलेला आहे. या बंदमध्ये सर्वानी सहभागी होऊन आपली वज्रमूठ दाखवावी, असे आवाहन केल्यामुळे त्याला सर्वानीच चांगला प्रतिसाद दिला. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बसवराज वळसंगे, सचिव दिनेश गिल्डा, विश्वनाथ किणीकर, प्रदीप सोळंकी, प्रदीप सोनवणे आदींनी पहिल्या दिवशी बंदला दिलेल्या प्रतिसादाबद्दल विविध व्यापारी संघटनांचे आभार व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2013 5:00 am

Web Title: protest against lbt successful in latur
टॅग Latur,Lbt,Protest
Next Stories
1 सुराज्यासाठी काँग्रेसला हटवा – मोदी
2 बालभारतीची सात लाख पुस्तके नष्ट करणे अनुचित -प्रा. पुरके
3 .. डोळ्यांचे पारणे फेडले
Just Now!
X