News Flash

मराठी शाळा बंद करणाऱ्या सरकारचा औरंगाबादमध्ये निषेध

मानवी साखळी करुन सरकारचा निषेध

मराठी शाळा बंद करणाऱ्या सरकारचा औरंगाबादमध्ये निषेध

‘मराठी दिनाच्या नकोत शुभेच्छा, दाखवा मराठी शाळा वाचवण्याची इच्छा.’ ‘मराठी शाळा टिकवा, मराठीतून मुलामुलींना शिकवा’ असे फलक हातात घेऊन १३०० मराठी शाळा बंद करणाऱ्या राज्य सरकारचा औरंगाबादमध्ये निषेध करण्यात आला. मराठी दिनाच्या दिवशीच ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने सरकारचा निषेध केला. औरंगाबाद येथील खोकडपुरा भागात असलेल्या महानगर पालिकेच्या शाळेजवळ मानवी साखळीही तयार करण्यात आली होती.

एकीकडे मराठी भाषा दिनाचे कार्यक्रम करण्यात आले. एखाद्या उत्सवाप्रमाणे हा दिवस साजरा करण्यात येतो आहे. अशात १३०० मराठी शाळा बंद केल्या जाण्याच्या मुद्द्यावर सरकार गप्प आहे. अत्यंत सोयीस्करपणे या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले जात आहे असाही आरोप यावेळी आंदोलकांनी केला. हे सरकार मराठी विरोधी आहे गेल्या काही वर्षांपासून रविवार बाजार जवळ सुरु असलेली शाळाही बंद करण्यात आली. एकीकडे सरकारने मराठी शाळा बंद करायच्या आणि दुसरीकडे मराठी संस्कृती जपल्याचा सूर आळवायचा हे दुटप्पी धोरण आहे आहे असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2018 7:24 pm

Web Title: protest and human chain against state government who wanted to close marathi schools
Next Stories
1 कचराकोंडीवरून औरंगाबाद महापालिकेचा तेरावा घालणार नागरिक
2 शेतकऱ्यांना आरक्षण द्या: शरद पवार
3 मराठा क्रांती मोर्चाचा आर्थिक निकषावरील आरक्षणाला विरोध
Just Now!
X