07 August 2020

News Flash

जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीमुळे बीडमध्ये जनक्षोभ

गेल्या दीड वर्षांपासून बीड जिल्ह्य़ातील वाळूमाफिया, अनधिकृत बांधकामे, टँकरमाफिया यांचे कर्दनकाळ बनलेले जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या तडकाफडकी बदलीमुळे येथील प्रचंड जनक्षोभ उसळला.

| November 29, 2013 12:54 pm

गेल्या दीड वर्षांपासून बीड जिल्ह्य़ातील वाळूमाफिया, अनधिकृत बांधकामे, टँकरमाफिया यांचे कर्दनकाळ बनलेले जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या तडकाफडकी बदलीमुळे येथील प्रचंड जनक्षोभ उसळला. लोकांनी उत्स्फूर्त आंदोलन छेडत केंद्रेकर यांची बदली रद्द करण्याची मागणी केली. शिवसेना, भाजप व मनसेनेही या आंदोलनात उडी घेत केंद्रेकर यांच्या बदलीविरोधात आज, शुक्रवारी बीडमध्ये बंदची हाक दिली आहे. केंद्रेकर यांनी अनधिकृत बांधकामे, वाळूमाफिया आणि टँकरमाफिया यांच्यावर कठोर कारवाई केली. या प्रकारामुळे दुखावल्या गेलेल्या वाळूमाफिया व बिल्डर लॉबीने केंद्रेकरांच्या बदलीसाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न चालवले होते. अखेरीस गुरुवारी त्यांच्या बदलीचे आदेश निघाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 12:54 pm

Web Title: public agitation against collector transfer in beed
टॅग Sunil Kendrekar
Next Stories
1 जायकवाडीतील पाणी सोडण्यावरून ११ शेतकऱयांनी स्वतःला कोंडले
2 केंद्रेकरांच्या बदलीच्या निषेधार्थ बीडमध्ये कडकडीत ‘बंद’
3 पश्चिम महाराष्ट्र धुमसताच!
Just Now!
X