महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त करून ठेवलेल्या सुमारे 200 वाहनांना आग लागून ही वाहने जळून खाक झाले आहेत. ही घटना (दि.24) रोजी संध्याकाळी हांडेवाडी येथे जेएसपीएम कॉलेज जवळील मैदानात पावणेसातच्या सुमारास घडली. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

पुणे महापालिकेचे प्रभारी अग्निशमन अधिकारी पंकज जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील हांडेवाडी सर्व्हे क्र. 56 येथे जेएसपीएम कॉलेज जवळील मैदानात हातगाडी,दुचाकी आणि चार चाकी गाड्या जप्त करून ठेवलेल्या सुमारे 200 वाहनांना आग लागून ही वाहने जळून खाक झाले आहेत.  एक टँकर आणि खासगी टँकरच्या मदतीने ही आग साडेआठच्या सुमारास नियंत्रणात आणण्यात आली. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.