24 November 2020

News Flash

VIDEO – पुण्यात हॉटेलमध्ये घुसली फॉर्च्यूनर कार, वेटरचा मृत्यू

पुण्यात एक विचित्र अपघात घडला आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हॉटेलमध्ये कार घुसली. या अपघातात हॉटेलमधील एका वेटरचा मृत्यू झाला असून कारचालक आणि महिला जखमी झाली

पुण्यात सोमवारी दुपारी एक विचित्र अपघात घडला आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलमध्ये घुसली. पुण्यातील सांगवी परिसरातील फेमस चौकात दुपारी एकच्या सुमारास हा अपघात घडला. एका वळणावर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट अनंत भोजनालयात घुसली.

या अपघातात हॉटेलमधील एका वेटरचा मृत्यू झाला असून कारचालक आणि महिला जखमी झाली आहे. सुदैवाने यावेळी भोजनालयात कोणीही नव्हते अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. सचिन जाधव असे चालकाच नाव आहे.

गाडीत मुलगा, महिला आणि चालक होता. कारचालक सचिन आणि महिला जखमी झाले आहेत. निखिल पुरोहित असे गाडीच्या मूळ मालकाचे नाव आहे. मृत व्यक्तिचे नाव समजलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 1:58 pm

Web Title: pune car enter in hotel
Next Stories
1 मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; नादुरूस्त कारला धक्का देताना टेम्पोने उडवले, पाच जण ठार
2 राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत
3 शिवसेनेच्या आमदार-खासदारांचे शीतयुद्ध
Just Now!
X