वाई: प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने शिवप्रताप दिनानिमित्त देण्यात येणारा वीर जीवा महाले पुरस्कार प्रखर हिंदुत्ववादी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांना तर अभिवक्ता पंताजीकाका बोकील पुरस्कार गोरक्षक अ‍ॅड. कपिल राठोड यांना जाहीर करण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार वितरण कार्यक्रम अक्षय तृतीय्येच्या मुहूर्तावर साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचा वध केला. हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून तसेच वाईनगरीचा अफजलखानाच्या विळख्यातून मुक्त केल्याबद्दल समितीच्या वतीने मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार शिवप्रताप दिनी पुरस्कार वितरण न करता १५ मे २०२१ रोजी अक्षय तृतीय्येच्या मुहूर्तावर होईल. यावेळी शिवव्याख्याते ह.भ.प. राकेश पिंजण (उरळी देवाची) यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या वेळी शाहीर शरद यादव (दरेवाडी- बावधन) यांचा अफजलखान वधाचा पोवाड्याचा कार्यक्रम होणार असल्याचे समितीने दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान
Vijay Bhatkar
डॉ. विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर