11 November 2019

News Flash

गणेशोत्सवाचे जनक भाऊसाहेब रंगारी नव्हे, पुणे महापालिकेने हटवला उल्लेख

गणेशोत्सवाचे जनक कोण ? लोकमान्य टिळक की, भाऊसाहेब रंगारी यावरुन मागच्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये वाद सुरु आहे. शुक्रवारी महानगरपालिकेच्या वेबसाईटवर माहिती प्रसिद्ध झाली होती.

पुणे महानगरपालिकेने आपल्या वेबसाईटवरुन भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वप्रथम गणेशोत्सवाची सुरुवात केल्याचा उल्लेख हटवला आहे. गणेशोत्सवाचे जनक कोण ? लोकमान्य टिळक की, भाऊसाहेब रंगारी यावरुन मागच्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये वाद सुरु आहे. शुक्रवारी पुणे महानगरपालिकेने आपल्या वेबसाईटवर भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वप्रथम १८९२ साली पुण्यात गणेशोत्सव सुरु केला अशी माहिती प्रसिद्ध केली होती. यावरुन वाद झाल्यानंतर आता पुणे महापालिकेने भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात गणेशोत्सवाची सुरुवात केल्याचा उल्लेख हटवला आहे.

भाऊ रंगारी हे आयुर्वेदाचे डॉक्टर होते. त्यांनी त्यांची गणेश मुर्ती दर्शनासाठी सर्वांना खुली ठेवली होती. जेणेकरुन त्यानिमित्ताने लोक एकत्र येतील व विचारांचे आदान-प्रदान होईल असे महापालिकेच्या संकेत स्थळावर म्हटले आहे.  शुक्रवारी भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वप्रथम १८९२ साली पुण्यात गणेशोत्सव सुरु केला असे म्हटले होते.

महापौर मुक्ता टिळक यांना याबाबत विचारले असता त्यांनी महापालिकेच्या वेबसाईटवर अशा प्रकारचा उल्लेख नसल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पुणे महापालिकेने भाऊसाहेबांच्या योगदानाची दखल घेतल्याबद्दल भाऊसाहेब रंगारी मंडळाचे विश्वस्त सूरज रेणुसे यांनी आभारही मानले होते.

भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ साली सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केल्याचे अनेक कागदपत्रातून स्पष्ट होते असा त्यांचा दावा होता. पुणे महापालिका प्रशासन आणि सताधारी भाजपच्या वतीने गतवर्षी सर्वाजनिक गणेशोत्सवाचे १२५ वे वर्ष साजरे करण्यात आले होते. त्याला भाऊसाहेब रंगारीच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला होता.

भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केल्याचा उल्लेख पुणे महापालिकेने हटवल्यानंतर त्या विरोधात सायबर विभागाकडे तक्रार करण्यात येणार आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या विश्वस्तांनी हा निर्णय घेतला आहे.

First Published on August 25, 2018 11:36 am

Web Title: pune corporation ganeshutsav bhausaheb rangari