News Flash

प्रभाकर देशमुख यांच्या कुटुंबीयांकडील जमिनीचा अकृषक परवाना रद्द

पुणे विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख यांची पत्नी, मुलगा यांच्या नावावर जांभे (ता. सातारा ) येथे असलेली जमीन ‘कमाल जमीन धारण कायद्या’पेक्षा जास्त असल्याने तिचा ‘बिगर

| February 14, 2014 01:26 am

पुणे विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख यांची पत्नी, मुलगा यांच्या नावावर जांभे (ता. सातारा ) येथे असलेली जमीन ‘कमाल जमीन धारण कायद्या’पेक्षा जास्त असल्याने तिचा ‘बिगर शेती परवाना’ जिल्हा प्रशासनाने रद्द केला आहे. या व्यवहाराच्या प्राथमिक चौकशीत हा आदेश बजावला असून याची पुढील चौकशी पुण्याच्या अपर आयुक्तांकडे सोपवली आहे.
जांभे (ता. सातारा) येथे देशमुख यांच्या नावावर तीन एकर, पत्नी अनुराधा यांच्या नावावर ५३ एकर तर मुलगा मयुराज यांच्या नावावर ३७ एकर जमीन आहे. कमाल जमीन धारण कायद्यानुसार ही जमीन जास्त असल्याने त्यास भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे सातारा येथील जिल्हाध्यक्ष संदीप जगताप यांनी हरकत घेतली होती.
या मागणीवर सातारा जिल्हा प्रशासनाने या व्यवहाराची नुकतीच चौकशी पूर्ण केली. त्यात देशमुख यांचा मुलगा आणि पत्नीच्या नावावर कमाल जमीन धारण कायद्यापेक्षा जास्त जमीन आढळली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने या जमिनीचा अकृषक परवाना रद्द केला आहे. तसेच याची पुढील चौकशी पुण्याच्या अपर आयुक्तांकडे सोपवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 1:26 am

Web Title: pune divisional commissioner prabhakar deshmukh
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ
2 भू-विकास बँकोंच्या जीवदानास सर्वपक्षीय समिती अनुत्सुक
3 आरोग्य तक्रार निवारणाचा पाच जिल्ह्य़ांत प्रयोग
Just Now!
X