पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूजा कोद्रे यांना 8 हजार 991 तर शिवसेनेच्या मोनिका तुपे यांना 5 हजार 479 यांना मते मिळाली. या मताच्या आकडेवारी वरून 3 हजार 521 मतांनी पूजा कोद्रे विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा गड राखण्यात त्यांना यश आले आहे. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप अशी तिरंगी लढत पाहण्यास मिळाली. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अखेरच्या क्षणा पर्यँत खऱ्या अर्थाने लढत पाहण्यास मिळाली असून यामध्ये राष्ट्रवादी च्या पूजा कोद्रे विजयी झाल्या आहे.

प्रभाग क्रमांक 22 च्या नगरसेविका आणि माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत काल 35 टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीचे निर्णय अधिकारी म्हणून ज्ञानेश्वर मोळक यांनी काम पाहिले.राष्ट्रवादी काँग्रेस कडून पूजा कोद्रे यांना 8 हजार 991 भाजपकडून सुकन्या गायकवाड यांना 4 हजार334 आणि शिवसेनेकडून मोनिका तुपे यांना 5 हजार 470 एवढी मते मिळाली आहेत. या तीन ही उमेदवारांची आकडेवारी पाहता राष्ट्रवादी च्या पूजा कोद्रे या 3 हजार 521 मतांनी विजयी झाल्या आहेत.

याच प्रभागातील पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक चेतन तुपे असल्याने त्यांची प्रतिष्ठापणाला लागली होती.मात्र गतवर्षी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पॅनेल आणण्यात त्यांना यश आले. त्या प्रमाणे या निवडणुकीत देखील त्यांना यश आले आहे. या पोटनिवडणुकीमुळे राष्ट्रवादीला गड राखता आल्याची चर्चा हडपसरमध्ये ऐकण्यास मिळत आहे.