News Flash

फुरसुंगी कचरा डेपो कायमचा होणार बंद

डेपोमध्ये डिसेंबर २०१९ पर्यंत कचरा टाकणे कायमचे बंद होईल अशी माहिती पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

(संग्रहित छायाचित्र)

उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोत पुणे शहराचा कचरा टाकला जातो.तर तेथील डेपोमध्ये डिसेंबर 2019 पर्यँत कचरा टाकणे कायम बंद होणार असल्याची घोषणा पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली. डिसेंबर 2019 मध्ये कचरा प्रकल्प बंद होण्याची घोषणा शिवतरे यांनी आज केली असल्याने फुरसुंगी आणि उरुळी देवाचे ग्रामस्थ कचरा कोंडीतून मुक्त होणार आहे. तर आता पुणेकर नागरिकांचा कचरा कुठे जिरवला जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या अकरा गावाच्या प्रश्ना बाबत आज राज्यमंत्री विजय शिवतरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव, गटनेते संजय भोसले तसेच उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री विजय शिवतरे म्हणाले की,उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये मागील 25 वर्षांपासून कचरा टाकला जातो.तेथील कचरा प्रकल्प बंद व्हावा. या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन करण्यात आले.या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आधिकायाशी चर्चा झाली असून पुणे शहरात नव्याने 5 कचरा प्रकल्प मार्च 2019 अखेर पर्यँत उभारली जातील. तर डिसेंबर अखेर उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथे कचरा टाकणे बंद होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की,गतवर्षी पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावामध्ये पायाभूत सुविधा देण्याची गरज असून नागरिकांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 8:58 pm

Web Title: pune garbadge depo will close in 2019
Next Stories
1 गूढ उलगडले, ८०० रुपये आणि मेमरी कार्डसाठी मित्रानेच केली हत्या…
2 धक्कादायक! पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या
3 आरक्षणासाठी मराठा बांधवांचे २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण
Just Now!
X