25 January 2020

News Flash

पुणे : पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

दोन वर्षांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला होता, नाशिकमध्ये राहणाऱ्या मृताच्या आईच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

प्रतिनिधिक छायाचित्र

एका 34 वर्षीय व्यक्तीच्या आत्महत्येप्रकरणी पुण्याच्या उत्तमनगर पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अरुण सुरेश वाबळे (वय 34, रा. कोंढवे-धावडे, एनडीए रोड) असे मृत पतीचे नाव असून याबाबत त्यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीनंतर मृताच्या पत्नीसह सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पत्नीकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद होत होते. मृताच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार, पत्नी आणि सासरच्यांकडून अरुण यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. तसंच अरुण यांना शिवीगाळ करून मारहाणही करण्यात आली होती, शिवाय गंभीर परिणाम भोगायला लागतील अशी धमकी देखील करण्यात आली होती. अरुण वाबळे यांचा दोन वर्षांपूर्वी अर्चनासोबत प्रेमविवाह झाला होता. अर्चना खासगी शिकवणी घ्यायच्या तर अरूण हे पेटिंगचं काम करायचे. त्यांना दोन मुले आहेत. पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद होत होते. परिणामी, सततच्या त्रासाला कंटाळून अरुण यांनी शनिवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. नंतर नाशिकमध्ये राहणाऱ्या अरुण यांच्या आईच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अर्चना, तिचा भाऊ व बहिण यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

First Published on September 11, 2019 12:25 pm

Web Title: pune husband suicide case wife in laws booked for abetment sas 89
Next Stories
1 पोलीसभरती प्रक्रिया ‘महापरीक्षा’द्वारे नको
2 वनरक्षक परीक्षेत गैरप्रकाराचा आरोप
3 संकेतस्थळावर दुचाकी विक्रीच्या व्यवहारात एकाला गंडा
Just Now!
X