कात्रज घाटातील डोंगर परवानगीविना फोडून त्याच्यावर अनधिकृत बांधकाम केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर किसन धावजी राठोड याला अखेर गुरुवारी पहाटे पोलिसांनी अटक केली. त्याचा भाऊ पंडित राठोड हा मात्र अद्याप फरार आहे.
किसन व पंडित राठोड या दोघांविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कलमांखाली दोषी आढळल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. किसन राठोड याला अटक केल्यांतर राजगड ठाण्याच्या पोलिसांनी त्याला गुरुवारी भोर येथील न्यायालयात हजर केले. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याची विनंती पोलिसांनी केली. मात्र, न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला, अशी माहिती राजगड ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिली.
कात्रजवळील शिंदेवाडी येथे ११२अ या गटात किसन राठोड व त्याच्या भावाने मिळून सुमारे साठ एकर जमीन घेतली आहे. त्याच्याबरोबरच काही पोलीस अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांनी जमीन खरेदी केली आहे. त्या ठिकाणी राठोडने कोणत्याही परवानगीविना आणि न्यायालयाने स्थगिती दिलेली असतानाही डोंगर फोडून रस्ते तयार केले, प्लॉटही पाडले. त्यामुळे त्याच्या विरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वीही डिसेंबर २०११ मध्ये त्याच्याविरुद्ध खनिज चोरल्याचा आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय याच कारणावरून त्याला दोनदा ५६ लाख ५७,३०० व १२ लाख ७१,२०० रुपयांचा दंड करण्यात आला. गेल्या आठवडय़ात िशदेवाडी येथे पुरात मायलेकींचा मृत्यू झाला. त्यासही राठोड याच्या बांधकामातून  माती वाहून येणेच कारणीभूत ठरले होत़े

आर.आर. यांचे कारवाईचे आश्वासन
कात्रज टेकडी प्रकरणी आमदार नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन तेथील परिस्थिती सांगितली, त्यांनी या प्रकरणी कारवाईचे आश्वासन दिले. वर्षांनुवर्षे कात्रज टेकडी फोडली जात असल्यामुळे ही घटना घडली. पोलिसांच्या आशीर्वादामुळे किसन राठोड यांनी खनिज, प्लॉट व रस्त्यासाठी टेकडी फोडल्याचे निष्पन्न झाले असल्याचे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

boy tied to tree, boy beaten Temghar Pada,
ठाणे : १० वर्षीय मुलाला पेरूच्या झाडाला बांधून मारहाण, आरोपींविरोधात गुन्हा दाखल
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप