27 October 2020

News Flash

सौर उर्जेवर चालणार पुण्यातली मेट्रो स्टेशन्स-दीक्षित

पुणे मेट्रोचे मॉडेल राज्यातल्या इतर शहरांमध्येही राबवण्यात येईल असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

पुण्यातल्या मेट्रोच्या कामाला वेग आला आहे, मेट्रोच्या स्टेशन्ससाठी तीन ठिकाणच्या जागा आरक्षित करण्यात आल्या असून ही मेट्रो स्टेशन्स सौर उर्जेवर चालणार आहेत, अशी माहिती मेट्रोचे व्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.  मेट्रो स्टेशनसाठी आरक्षित करण्यात आलेल्या जागा २ महिन्यात मेट्रोच्या ताब्यात येतील, वनाज, रेजहिल्स आणि शिवाजी नगर ही मेट्रोची तीन स्थानके असणार आहेत, ही तिन्ही स्थानके सौर उर्जेवर चालतील, अशीही माहिती दीक्षित यांनी पत्रकारांना दिली.

जगातल्या २०५ शहरांमध्ये मेट्रो आहे, भारतातही अनेक शहरांमध्ये मेट्रो आहे, तसेच अनेक शहरांमध्ये मेट्रोचे काम पूर्णत्त्वासही आले आहे. पुण्याची भौगोलिक परिस्थिती आणि सध्याचे मेट्रोचे काम पाहता, येत्या काळात पुणे मेट्रो मॉडेल हे देशभरातील मेट्रोसाठी येत्या काळात राबवले जाऊ शकते असेही दीक्षित यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे मेट्रोकडे देशातल्या अनेक राज्यांचे लक्ष लागले आहे, शहरातील वाहतूक कोंडीबाबत अनेकवेळा चर्चा होते, मात्र मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावर पुणेकरांना चांगला प्रवास करता येईल आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असा विश्वासही दीक्षित यांनी व्यक्त केला. पुणे मेट्रोच्या कामाला गती मिळाली असून २०२१ पर्यंत हे काम पूर्ण होईल, असेही दीक्षित यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी ८४५ कोटी युरो खर्च येणार आहे. या ८४५ कोटी युरोंपेकी, ६०० मिलियन युरो युरोपियन इनव्हेस्टमेंट बँक देणार आहे, तर उर्वरित २४५ मिलियन युरोसाठी अर्थ मंत्रालय आणि फ्रान्स डेव्हलपमेंट बँकेशी चर्चा करण्यात आली आहे अशीही माहिती यावेळी दीक्षित यांनी दिली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2017 7:19 pm

Web Title: pune metro will run on solar energy
Next Stories
1 गावकरीच निवडू शकणार गावाचा सरपंच!
2 वारकऱ्यांच्या गाडीला अपघात, 1 जण ठार
3 भुजबळांना दिलासा, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करता येणार
Just Now!
X