News Flash

पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प

कंटेनर बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अमृतांजन पुलाजवळ कंटेनर बंद पडल्यामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. महामार्गावरील कंटेनर बाजूला करण्यासाठी तब्बल दिडतासापासून प्रयत्न सुरु आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी महामार्गावर वाहतुक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. पुणे आणि मुंबईच्या दिशेने जाण्याची वाहतूक ठप्प झाल्यानंतर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासन लवकरात लवकर कंटेनर बाजूला करुन महामार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कंटेनर बंद पडल्यामुळे पुणे- मुंबई दरम्यानची एसटीची वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 4:05 pm

Web Title: pune mumbai express highway traffic jam
Next Stories
1 ऑगस्ट महिन्यात पावसाची दडी!
2 खडसे यांचा शनिशिंगणापूर दौरा
3 कोठडीतील आरोपी महिलेवर बळजबरीचा प्रयत्न, फौजदार निलंबित, अद्याप गुन्हा नाही
Just Now!
X