नवी मुंबईतील सानपाड्याजवळ दुचाकीस्वाराला वाचवताना एसटीच्या शिवनेरी बसचा गुरुवारी रात्री अपघात झाला असून या घटनेत पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पुण्यावरुन मुंबईला येणाऱ्या बसला हा अपघात झाला असून बसमध्ये एकूण २० प्रवासी होते.

राज्य परिवहन महामंडळाची शिवनेरी बस पुण्यातून मुंबईच्या दिशेने येत असताना सानपाड्याजवळ बसचा अपघात झाला. दुचाकीस्वाराला वाचवताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या दुभाजकाला आदळून उलटली. या अपघातात बसमधील ५ प्रवासी जखमी झाले. बसचा चालक सुखरुप असून बसमधील जखमी प्रवाशांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.