27 February 2021

News Flash

बँक ऑफ महाराष्ट्र प्रकरण: रवींद्र मराठे यांच्याकडून काढून घेतला पदभार

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना अटक झाली होती.

संग्रहित छायाचित्र

डीएसके कर्ज प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता मराठे यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे. दिल्लीहून विशेष बैठकीसाठी आलेल्या गुप्ता यांना पुण्यातच थांबण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याचे समजते.

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत, विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. हे चारही अधिकाऱ्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता रवींद्र मराठे आणि राजेंद्रकुमार गुप्ता यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे. आलेख राऊत यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा तात्पुरता कार्यभार सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, बँकेच्या अधिकाऱ्यांवरील कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. शरद पवार आणि राज ठाकरे यांनी जाहीरपणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते. बँकेची कर्ज वितरण अनियमितता मान्य केली तरी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्थानिक तपास यंत्रणेला अटक करण्याचे अधिकार आहेत का याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 6:27 pm

Web Title: pune police dsk case bank of maharashtra ravindra marathe
Next Stories
1 VIDEO: तो क्षण जेव्हा चार्टर्ड विमान कोसळलं आणि उठले आगीचे लोळ
2 शेतकरी विरोधी भाजप सरकारला शेतकरी घरी बसवणार: राजू शेट्टी
3 पीव्हीआरमध्ये राडा घालणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक
Just Now!
X