22 September 2020

News Flash

Elgaar Parishad violence case: आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतून अटक

न्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यानंतर आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

आनंद तेलतुंबडे (संग्रहित छायाचित्र)

न्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यानंतर आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांनी मुंबईत ही कारवाई केली आहे. विलेपार्ले पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी सुरु आहे. आनंद तेलतुंबडे यांच्यावर भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोप आहे. पुणे न्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळत त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता.

आनंद तेलतुंबडे यांनी पुणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. शोमा सेन यांच्या लॅपटॉपमध्ये जे मेल मिळाले आहेत, त्यानुसार तेलतुंबडे यांनी पॅरिसला जाऊन कोरेगाव भीमा विषय ज्वलंत ठेवावा असे सूचित करण्यात आले. मात्र हा मेल बनावट असल्याचा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला होता. आनंद तेलतुंबडे हे अमेरिकन विद्यापीठाच्या निमंत्रणावरून २०१७ ला पॅरिसला गेले होते. त्याचा खर्च हा त्या विद्यापीठाने केला होता.या दौऱ्याचा माओवाद्यांशी काहीही संबंध नाही, असेही बचावपक्षाचे म्हणणे होते. न्यायालयात सादर केलेल्या कोणत्याही पत्रामध्ये आनंद तेलतुंबडे यांचा थेट उल्लेख नाही. जर कॉम्रेड प्रकाश म्हणजे प्रकाश आंबेडकर होऊ शकत नाही. तर कॉम्रेडचा अर्थ आनंद तेलतुंबडे कसा होईल, असा दावा बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला होता.

सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर शुक्रवारी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल दिला. न्यायालयाने तेलतुंबडे यांचा अर्ज फेटाळून लावला होता. यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. मुंबई विमानतळावरुन ही कारवाई करण्यात आली. त्यांना दुपारपर्यंत पुण्यातील न्यायालयात हजर केले जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 7:24 am

Web Title: pune police takes anand teltumbade in custody
Next Stories
1 दहावी अनुत्तीर्ण चित्रकाराचे वारली संस्कृतीवर इंग्रजी पुस्तक
2 केंद्र व राज्य सरकारचा निषेध, नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन
3 ‘आणीबाणीतील संघी कार्यकर्त्यांना १० हजार आणि शेतकऱ्याला ५०० रुपये, ही शेतकऱ्यांची चेष्टा नाही का?’
Just Now!
X