News Flash

पुण्याची श्रुती श्रीखंडे ‘सीडीएस’ परीक्षेत देशात पहिली

श्रुती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची कन्या

श्रुती श्रीखंडे

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. श्रुती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची कन्या असून पुण्यातील आयएलएस कॉलेजची ती विद्यार्थिनी आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेसचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून तोंडी आणि लेखी परीक्षेचा यात समावेश असतो. चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये (ओटीए) तिला प्रवेश मिळणार आहे. सीडीएसमध्ये लेखी परीक्षा व मुलाखत हे दोन टप्पे असले तरी शारीरिक क्षमता हा तितकाच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे श्रुतीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे. एप्रिल २०१८ पासून तिच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.  तिचे शालेय शिक्षण आर्मी पब्लिक स्कूलमधून झाले आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या १०७ व्या तुकडीसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. चेन्नईत नॉन टेक्निकल कोर्ससाठी श्रुतीची निवड झाली. देशभरातील फक्त २३२ विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुलांमध्ये निपूर्ण दत्ता देशात पहिला आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 9:39 am

Web Title: pune shruti vinod shrikhande topper among girl in india combined defence services examination upsc
Next Stories
1 मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्थेची झाली कासवछाप अगरबत्ती: शिवसेना
2 नरेंद्र मोदींनी बहुमत वाया घालवले
3 यवतमाळमध्ये काँग्रेस नगरसेवकासह पाच आरोपींना अटक
Just Now!
X