राज्य शासनाच्या आदेशानुसार २३ जूनपासून राज्यभरात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली. हे आदेश प्राप्त होताच प्रशासनाने दुकानदारांकडे प्लॅस्टिक पिशवी असताच कारवाई सुरु केली. पुण्यातही कारवाईला सुरुवात करण्यात आली.  या कारवाईच्या निषेधार्थ पुण्यातील रिटेल दुकानदारानी देखील बंद पुकारला. या बंद मध्ये पुण्याचे प्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवाले यांनी देखील एक दिवसाचा बंद पाळला आहे.

राज्य शासनाने २३ जून पासून राज्यात आदेशानुसार राज्यातील सर्व ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.या प्लास्टिक बंदीचे नागरिकांसह व्यापारी वर्गाने देखील स्वागत केले आहे. मात्र ही दंडात्मक कारवाई योग्य नसून अन्यायकारक आहे. या पार्श्वभूमीवर आज रिटेल व्यापारी संघटनेकडून पुणे महानगर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. प्लास्टिक पिशव्याना पर्याय न दिल्यास किंवा ही कारवाई न थांबल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा व्यापारी संघटनेने सत्ताधारी भाजप पक्षाला त्यांनी दिला आहे.

त्याच्या संपात मिठाई फरसाण आणि डेअरी धारक हे देखील सहभागी झाल्याने नागरिकांना खाद्यपदार्थांपासून दूर राहावे लागले आहे. यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवाले बंद असल्याने नागरिकांनी नाराजी या सर्व बंदच्या घडामोडी लक्षात घेता राज्य सरकार कशाप्रकारे बंदचा राज्य सरकार कशाप्रकारे तोडगा काढते हे पाहणे महत्त्वाचे आहे.