05 March 2021

News Flash

दिवाळीसाठी येरवड्यातील कैद्यांनी केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता नागेश भोसले आणि मुकेश हृषी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं.

येरवड्यातील कैद्यांनी केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन

दिवाळीच्या मुहूर्तावर येरवडा कारागृहातल्या कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन येरवडा कारागृहात भरवण्यात आलं आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता नागेश भोसले आणि मुकेश हृषी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. दिवाळीपर्यंत हे प्रदर्शन ग्राहकांसाठी असणार आहे.

शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना कारागृहात विविध कामं दिली जातात. मग ते सुतारकाम असेल, लोहारकाम असेल, शिवणकाम, लघुउद्योग ते अगदी बेकरी उत्पादनं तयार करणं. उद्देश एवढाच की त्यांच्यातली अपराधीपणाची भावना कमी व्हावी. त्यांना सर्वसाधारण आयुष्य जगता यावं आणि त्यातूनच इथं आलेले कैदी आपापल्या आवडीच्या उद्योगात रमतात आणि त्यांचे हात साकारतात उत्तमातल्या उत्तम गोष्टी.

येरवडा कारागृह प्रशासनाने कैद्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे कारागृहातील कैद्यांचा पोलीस हा खऱ्या अर्थाने मित्र आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेते मुकेश हृषी यांनी दिली. तसेच येरवडा कारागृहाच्या उपक्रमाची दखल देशांतील इतर कारागृहांनी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तर या उपक्रमांतून येरवडा कारागृह पोलिसांनी कैद्यांमधील अवगुण मारून गुणांना प्राधान्य दिले असल्याचे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने म्हटले.

कैद्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून इथं तयार होणाऱ्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून दिली जाते. मात्र तरीही कैद्यांचा शिक्का बसला म्हटल्यावर इतरांपासून तुटलेपण येतंच. कैद्यांमधली हीच भावना कमी व्हावी म्हणूनच हा दिवाळी मेळा आयोजित केला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 3:49 pm

Web Title: pune yerawada central prison exhibited products for diwali made by the inmates
Next Stories
1 दिवाळी सुटय़ांमुळे एमटीडीसीचे रिसॉर्ट आरक्षित
2 भुसार बाजारात अद्यापही गर्दी नाही
3 मुंढवा प्रकल्पावरच ‘जलसंपदा’कडून प्रश्नचिन्ह
Just Now!
X