News Flash

घोटाळा मोदी सरकारच्या काळातील – शरद पवार

यूपीए सरकारच्या काळात नीरव मोदीने बँक खात उघडले. मात्र प्रत्यक्ष ११ हजार कोटी उशिराने आले.

शरद पवार (संग्रहित छायाचित्र)

हिरे  व जडजवाहीर उद्योगपती  नीरव मोदीबाबत २०१६ साली पंतप्रधान कार्यालयास एका जबाबदार व्यक्तीच्या पत्राने माहिती मिळाली होती. मात्र सरकार त्या पत्राआधारे  चौकशी करून खबरदारी घेऊ  शकले नाही . त्यामुळे देशाची लूट झाली. हा घोटाळा संपूर्णपणे  मोदी सरकारच्या काळातील आहे, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली. ते पंढरपूर  तालुक्यातील वाडीकुरोली येथे बोलत होते.

तालुक्यातील वाडीकुरोली येथे शेतकरी मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळयांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रसंगी त्यांच्यासमवेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा.विजयसिंह मोहिते पाटील, आ. भारत भालके, कल्याण काळे उपस्थित होते. यावेळी तानाजी चोरगे, गंगाधर म्हमाणे, नवनाथ कसपटे आणि डॉ. दिलीप शिंदे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पवार म्हणाले, यूपीए सरकारच्या काळात नीरव मोदीने बँक खात उघडले. मात्र प्रत्यक्ष ११ हजार कोटी उशिराने आले. याबाबत सरकारला माहिती मिळून २०१६ , १७ अशा दोन वर्षांत काही झाले नाही, असे सांगत यूपीए सरकारच्या काळात हा घोटाळा झाला. या  आरोपात तथ्य नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दिल्लीत आगामी निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. यामधे काँगेस— राष्ट्रवादी सर्वच साम्यवादी पक्षांना एकत्र येऊन निवडणुका लढवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर आगामी राज्याच्या निवडणुकात भाजपा पराभूत झालं तरीही मुदतपूर्व निवडणुका लागणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सरसंघचालक मोहन भागवतांनी सैनिकांबद्दल केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेताना ते म्हणाले की, काठय़ा घेउन स्वयंसेवकांना देशाच्या सीमेवर पाठवा. सैनिकांबद्दल राजकारण आणि टिंगल करू नका.

पवारच आमचे नेते –  सुशीलकुमार शिंदे

आपण जरी काँग्रेसमध्ये असलो तरी शरद पवार हेच आपले नेते आहे. आमच्यामधे  कितीही भांडणे असली, वेगळे दिसत असलो. तरी आम्ही एक आहोत. राजकारण हा आमचा धंदा आहे, अशी कोटी सुशीलकुमार शिंदे यांनी केली त्यावर  कार्यक्रमात एकच हशा पिकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 2:32 am

Web Title: punjab national bank scam during modi government says sharad pawar
Next Stories
1 मंत्रालयाला जाळ्या लावण्यापेक्षा शेतकऱ्याला दाम, हातांना काम द्या
2 आशुतोष काळे यांचा पुतळा जाळण्यावरून कोपरगावात राजकीय कार्यकर्त्यांत हाणामारी
3 अडीच एकरांवर साकारण्यात आली शिवरायांची महारांगोळी
Just Now!
X