News Flash

बंदी असूनही पुरंदरमध्ये जात पंचायत भरवली, सहा जणांवर गुन्हा दाखल

पुरंदर मधील गराडे येथील प्रकार

प्रतीकात्मक छायाचित्र

जात पंचायत भरण्यावर कायदेशीर बंदी असतानाही पुरंदर तालुक्यातील गराडे येथे भातु समाजाची जातपंचायत भरून एका महिलेला तिच्या कुटुंबियासह बहिष्कृत केल्याचा प्रकार घडला.पाच बोकड,पाच दारूच्या बाटल्या,एक लाख रुपये हा दंड भरला तरच पुन्हा जातपंचायती मध्ये घेतले जाईल असे पंचांनी जाहीर केले.यानंतर या महिलेने धनकवडी (पुणे) पोलिस ठाण्यात धाव घेतली दिपा (वय ३२ नाव बदललेले आहे रा धनकवडी पुणे ) यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करून सदर प्रकरण सासवड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले.याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि.०३) गराडे येथील राजलीला मंगल कार्यालयामध्ये जात पंचायत भरवण्याचा प्रकार घडला आहे.सदर महिलेने वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हिस्सा मागितला होता.त्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी बेकायदेशीरपणे जात पंचायत भरवण्यात आली.

यावेळी उपस्थित असलेल्या सहा जणांनी वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलीचा काहीच अधिकार नाही असा न्यायनिवाडा केला व त्या महिलेसह कुटुंबाला जातीतून बहिष्कृत केले.परत जातीत यायचे असेल तर पाच बोकड,पाच दारूच्या बाटल्या व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.स्वतःचे कायदे व कलम अमलात आणून भारतीय न्यायव्यवस्थेचा अपमान केल्याबद्दल व सामाजिक बहिष्कार यापासून व व्यक्तिचे संरक्षण अधिनियम २०१६ चे कलमानुसार आरोपी सुरेश रतन बिनावत (वय ६५ नगर हडपसर) नंदू आत्राम रजपूत (वय ५५ इंद्रप्रस्थ बंगला वारजे,पुणे) संपत पन्नालाल बिनावत ( वय ५६ रा सातव नगर हडपसर,पुणे) आनंदा रामचंद्र बिनावत ( वय ५० सातव नगर हडपसर,पुणे) देविदास राजू चव्हाण (वय ५२ नरे गाव पुणे) देवानंद राजू कुंभार ( वय ५१ धनकवडी पुणे ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सासवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.जेजुरी येथे पूर्वी पौष पौर्णिमा यात्रेच्या वेळी बंगाली पटांगणामध्ये अशा प्रकारच्या वैदू व भातु कोल्हाटी समाजाच्या जातपंचायती भरत होत्या परंतु शासनाने अशा बेकायदेशीर जातपंचायती वर बंदी घातल्याने या जात पंचायती कालबाह्य झाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 2:22 pm

Web Title: purandar jat panchayat six people fir nck 90
Next Stories
1 रेकॉर्ड ब्रेक! नितीन गडकरींचा विक्रमही अभिजित वंजारींनी मोडला
2 मराठा आरक्षण: घटनापीठासमोरील सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर
3 शरद पवारांचं सांगणं हे मार्गदर्शन म्हणून स्वीकारायला हवं; राऊत यांचा काँग्रेसला सल्ला
Just Now!
X