News Flash

Video : आकाशाच्या दिशेने झेप घेणारं पाणी पाहिलंत का?

'लोकसत्ता'ने ट्विट केलेला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून निसर्गाच्या या आगळ्यावेगळ्या खेळाबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पावसाळा सुरु झाला की ठिकठिकाणी पाणी साठू लागतं. नदी, ओढे, धबधबे दुथडी भरून वाहू लागतात. निसर्ग हिरवागार होता आणि प्रसन्न मुद्रेने आपल्याकडे पाहू लागतो. कधीकधी पाऊस रौद्र रूप धारण करतो. त्यावेळी सोसाट्याचा वारा आणि पावसाचा जोर यापुढे मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात. पण याच पावसाळ्यात आकाशाच्या दिशेने झेप घेणारं पाणी पण दिसून आलंय.

महाराष्ट्रातील पुण्याजवळ हे दृश्य पाहायला मिळाले आहे. पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात नाझरे नावाचे धरण आहे. राज्यभरात कालपासून बरसणाऱ्या पावसामुळे या धरणातील पाण्याची पातळी वाढली. इतकेच नव्हे सोसोट्याचा वारा वाहू लागल्याने चक्क धरणातील पाणी चक्रीवादळाच्या आकाराप्रमाणे आकाशात झेपावू लागले. हा सारा प्रकार व्हिडिओमध्ये कैद करण्यात आला असून हे पाणी आकाशाकडे झेपावण्याचे कारण वादळी वारा असल्याचे म्हटले जात आहे.

‘लोकसत्ता’ने ट्विट केलेला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून निसर्गाच्या या आगळ्यावेगळ्या खेळाबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 6:44 pm

Web Title: purandar nazre dam water flying in sky
Next Stories
1 पिंपरी-चिंचवड स्थायी समितीच्या अध्यक्षा झाल्या दहावी पास
2 मी अहमदनगरच्या उपमहापौरपदाचा राजीनामा दिलाच नाही-श्रीपाद छिंदम
3 जिल्हा परिषदेच्या शाळेच्या ठिकाणी खासगी कंपनीच्या शाळेला परवानगी नाही: विनोद तावडे
Just Now!
X