जिल्ह्य़ातील ३८ वाहनांची मुदत संपल्याने नवीन वाहन खरेदीसाठी प्रस्ताव

पालघर :  पालघर जिल्हा परिषदअंतर्गत असलेल्या ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे.  सेवेत असलेली तब्बल ३८ वाहने ही कालबाह्य़ झाली आहे. तरी ती दुरुस्ती करून वापरली जात आहे तर काही खासगी वाहनांचाही आधार घ्यावा लागत आहे.  त्यामुळे यावरील खर्च दिवसेंदिवस वाढू लागला आहे.  त्यासाठी  जिल्ह्य़ाचा कोविड निधीतून नवीन वाहने विकत घेण्याचे  प्रस्तावित करण्यात आले आहे.

Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
concrete road works Kalyan, Kalyan - Dombivli,
कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा
Nashik water
निम्म्या नाशिकमध्ये बुधवारी पुन्हा पाणी बंद

जिल्ह्यात ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत.  त्यापैकी पालघर तालुक्यात १०, डहाणू नऊ, वसई  आठ तसेच मोखाडा, वाडा, जव्हार व तलासरीत प्रत्येकी चार तर विक्रमगड तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र  आहेत. या ४६ केंद्रांपैकी कुडाळा, निर्मळ, धुंदलवाडी, घोलवड, तवा, साखरशेत, दुर्वेश व केळवे- माहीम या ठिकाणची वाहने गेल्या काही वर्षांपासून बंद आहेत. या ठिकाणी केंद्राच्या विविध कामांसाठी वैद्यकीय अधिकारी यांना खासगी किंवा भाडय़ाच्या वाहनांचा वापर करावा लागत आहे.

शासकीय नियमानुसार दहा वर्षांवरील आयुर्मान झालेली वाहने किंवा दोन लाख किलोमीटरहून अधिक प्रवास केलेल्या वाहनांचा वापर बंद करून त्याऐवजी नवीन वाहन घेण्याचे शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहे. मोखाडा तालुक्यातील वाशाळा व मोरआंडा, वसई तालुक्यातील चंदनसार व कामण, डहाणू तालुक्यातील सायवन व वाणगाव तर पालघर तालुक्यातील मुरबे व दांडी या आठ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहने दहा वर्षांंपेक्षा कमी आयुर्मानाची आहेत. उर्वरित ३० केंद्रांमधील शासकीय वाहने १० वर्षांंपासून अधिक वयोमानांची आहेत, अशी वाहने अनेकदा बंद पडत असल्याने त्याचा आरोग्य  सेवेवर परिणाम होत आहे. तर दुसरीकडे त्याच्या  देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च अधिकाधिक वाढत आहे.  त्याचा भुर्दंड प्रशासनाला सहन करावा लागत आहे.

पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य विभागातील ३८ वाहने नव्याने विकत घेण्याची आवश्यकता भासत आहे. जिल्ह्याकडे असलेल्या कोविड निधीमधून आरोग्य विभागासाठी वाहने घेण्याचे प्रस्तावित करण्यात येत असून याबाबत लवकरच वाहने मिळतील यासाठी प्रशासकीय मान्यता मिळविण्यात येईल.

-डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी.