News Flash

पुष्पक एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरला

थोडक्यात मोठी दुर्घटना टळली

पुष्पक एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरल्याची बातमी समोर आली आहे. एका डब्याचे चाक घसरल्याने मोठी हानी झालेली नाही. थोडक्यात मोठा अनर्थ टळला असून इगतपुरी रेल्वे स्थानकात हा डबा पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे. इगतपुरी स्थानकात मुंबई लखनऊ पुष्पक एक्स्प्रेसचा डबा घसरला. या घटनेमुळे मुंबईकडून मनमाडकडे जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक ठप्प झाली. पुष्पक एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकात शिरत असताना गाडीचा वेग मंद झाला होता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. कोणत्याही प्रकारची जीवितहानी न झाल्याने सगळ्याच प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. घसरलेला डबा दुरुस्त करण्याचं काम सुरु आहे.

मुंबईहून निघालेली पुष्पक एक्स्प्रेस इगतपुरी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवर येत असताना या एक्स्प्रेसचा डबा घसरला. ही गाडी स्थानकात शिरत होती त्यामुळे गाडीचा वेग कमी झाला होता. वेग कमी होता त्यामुळे मोठा अपघात टळला. दरम्यान एकीकडे इगतपुरीत पुष्पक एक्स्प्रेसचा डबा घसरल्याने मुंबईहून लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे पारसिक बोगद्याजवळ रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. ठाणे ते कल्याण दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. हे वृत्त समोर आलंच होतं. आता त्यापाठोपाठ पुष्पक एक्स्प्रेस घसरल्याची घटनाही घडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 12:36 pm

Web Title: pushpak express one coach derailed from the track scj 81
Next Stories
1 लाडका नेता जिंकला म्हणून कार्यकर्त्याचा १८ किलोमीटरचा दंडवत
2 Young soch wins: का म्हणतेय शिवसेना असं?
3 वंचित, एआयएमआयएममुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने गमवाल्या २५ जागा
Just Now!
X