26 February 2021

News Flash

मृत अजगराचे फोटो व्हायरल करणे पडले महागात

सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल

अजगराला मारून त्याचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल केलेल्या ७ जणांविरूद्ध नांदेड वनविभागाने गुन्हा दाखल केला असून या सर्वांना अटक करण्यात आली आहे. सोमवार (दि.20 जुलै) रोजी पाटनूर ग्रामपंचायत या व्हॉट्सअप ग्रुपवर अजगरास मारून त्यास ओढीत नेत असल्याचा फोटो व्हायरल केला होता. या व्हायरल फोटोची वनविभागाने दखल घेतली असून फोटोमधील ७ जणांची ओळख पटवली आहे.

परमेश्वर दत्ता कोकाटे, सटवाजी डुमणे, राजू गायकवाड, पंडित येळणे, अप्पाराव कोकाटे, रामा पतंगे, नागोराव मिरासे अशी या 7 जणांची नावे आहेत. या सर्वांनी अजर मारल्याची कबुली दिली आहे. त्यांना मुदखेड येथील न्यायालयात हजर केले असून त्यांच्याविरूद्ध वन्यजीव संरक्षक अधिनियम 1972 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना तीन वर्षांपर्यंत तुरूंगवास व 25 हजारांपर्यंतचा दंड लागू शकतो, असे वनविभागाने म्हटले आहे.

उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक वनसंरक्षक डी.एस.पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे, सचिन रामपुरे, वनपाल पी.ए.धोंडगे, बी.ए.हाकदळे, मानद वन्यजीवरक्षक अतिंद्र कट्टी, वनरक्षक शिंदे, घुगे, काकडे, गव्हाणे, दासरवाड, वसीम, जाधव आदिंनी या कारवाईसाठी परिश्रम घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 8:06 am

Web Title: python social midea viral seven criminal fir nanded nck 90
Next Stories
1 परदेशी जहाजात अडकलेले वसईकर सुखरूप
2 करोनाबाधितांसाठी जम्बो उपचार केंद्र
3 चाचण्यांची संख्या वाढवल्याने रुग्णसंख्येत वाढ
Just Now!
X