28 January 2021

News Flash

वेळापत्रकापूर्वीच प्रश्नपत्रिका!

जिल्ह्यात इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या घेतल्या जाणाऱ्या पायाभूत चाचण्यांसाठीच्या प्रश्नपत्रिका वेळापत्रक जाहीर नसताना दाखल झाल्या. त्यामुळे गुरुजींसह विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे वेळापत्रकासाठी शिक्षण

| August 21, 2015 01:10 am

जिल्ह्यात इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या घेतल्या जाणाऱ्या पायाभूत चाचण्यांसाठीच्या प्रश्नपत्रिका वेळापत्रक जाहीर नसताना दाखल झाल्या. त्यामुळे गुरुजींसह विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे वेळापत्रकासाठी शिक्षण विभागाकडून टोलवाटोलवी सुरू आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये प्रथम भाषा व गणित या दोनच विषयांच्या पायाभूत चाचण्या घेतल्या जाणार आहेत. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी शाळांमधून विशेष वर्ग घेऊन त्यांना २०१७ पर्यंत प्रगत करण्याचे नियोजन केले आहे. शिक्षण विभागामार्फत होणाऱ्या या चाचणीसाठी दुसरीच्या प्रथम भाषेतील २३ हजार ९७०, तर गणिताचे २३ हजार ९८३ विद्यार्थी जिल्ह्यात चाचण्या देणार आहेत. तिसरी वर्गातील भाषा व गणित विषयाचे प्रत्येकी २३ हजार ७९०, चौथीमध्ये भाषा व गणित विषयांचे प्रत्येकी २३ हजार ६८६, पाचवीचे भाषा विषयाचे २४ हजार ९९८ व गणित विषयाचे २४ हजार ९९३, सातवीचे भाषा विषयाचे २५ हजार ५६४ व गणित विषयाचे २५ हजार ५०७, सातवी भाषा विषयाचे २४ हजार ५२४ व गणित २४ हजार ५६१, आठवी भाषा विषयाचे २२ हजार १२१ व गणित २२ हजार १५१ विद्यार्थी चाचणी परीक्षा देणार आहेत.
जिल्ह्यास तब्बल ३ लाख ३७ हजार २५१ प्रश्नपत्रिकांची आवश्यकता आहे. यापूर्वी या चाचण्यांचे वेळापत्रक पाठविले होते. यात २० जुलस परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रश्नपत्रिका पोहोचल्याच नसल्यामुळे चाचण्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता परत चाचण्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्वशिक्षा अभियानाचे कर्मचारी सोमवारी प्रश्नपत्रिका नेण्यासाठी औरंगाबादला गेले होते. प्रश्नपत्रिका िहगोलीत दाखल झाल्या. परंतु वेळापत्रक आलेच नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. परीक्षेचे वेळापत्रक कधी येणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या चाचण्या २४ ते ३१ ऑगस्ट दरम्यान होणार असल्याचे सूत्रांनी सािंगतले. प्रभारी शिक्षणाधिकारी सोयाम यांच्याशी संपर्क साधला असता जिल्ह्यात पायाभूत चाचण्यांसाठी वेळापत्रक अजून प्राप्त झाले नाही. वेळापत्रक प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार चाचण्या घेतल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2015 1:10 am

Web Title: question paper before timetable
टॅग Hingoli
Next Stories
1 दाभोलकर हत्या तपासात सीबीआयच्या मदतीला पोलीस अधिकारी
2 कोल्हापूर काँग्रेसमध्ये गटबाजीला उधाण
3 वाढत्या उकाडय़ाने त्रस्त सोलापुरात पाऊस
Just Now!
X