News Flash

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी आबांची कन्या स्मिताची निवड

स्मिता यांच्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी ही जबाबदारी सोपवली आहे.

Smita patil: पदाच्या माध्यमातून युवतींना राजकारणात सक्रिय करणे व त्यांच्यात धाडस निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया स्मिता पाटील यांनी निवडीनंतर दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्मिता पाटील यांना राजकारणात सक्रिय करण्यात आल्याचे बोलले जाते. सध्या शिक्षण घेत असलेल्या स्मिता यांच्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी ही जबाबदारी सोपवली आहे.
पदाच्या माध्यमातून युवतींना राजकारणात सक्रिय करणे व त्यांच्यात धाडस निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया स्मिता पाटील यांनी निवडीनंतर दिली. सध्या महिलांवर होत असलेल्या अत्याचारप्रश्नी जनजागृती करणार असल्याचेही त्यांनी सांगत आबांची स्वच्छ प्रतिमा जपण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. आर. आर. पाटील हे राजकारणात राहिले तरी त्यांनी समाजकारणाचीच भूमिका ठेवली, तोच वसा मला पुढे न्यायचा आहे, असेही त्या म्हणाल्या.
आगामी नगरपरिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही निवड केल्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी स्मिता यांना प्रचारात उतरवण्याची पक्षाची योजना असल्याचे बोलले जाते. स्मिता पाटील यांनी यापूर्वी अवैध धंद्याविरोधात आंदोलन केले होते. डान्सबार बंदीबाबत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 4:54 pm

Web Title: r r patil daughter smita patil appointed as a rashtravadi yuvati congress president
Next Stories
1 जनसुराज्यसोबत जाणे आमच्यावर बंधनकारक नाही, राजू शेट्टींचे नाराजीचे सूर
2 धान्यबाजार फुलला; हजारो कोटींची उलाढाल
3 धनोत्रयोदशीला पहिला ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’
Just Now!
X