उद्धव ठाकरे हे सर्वाधिक गोंधळलेले राजकारणी आहेत, त्यांना “मोस्ट कन्फ्यूज्ड पॉलिटिशयन अॅवार्ड” द्यावा अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. शिर्डीमध्ये आज पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ करण्यात आला, त्यानंतर विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते.

रविवारी शिर्डी येथे झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विखे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला विखे यांनी सोमवारी प्रवरानगर येथील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना उत्तर दिले. विरोधी पक्षनेता म्हणून मी काय काम करावं हे तुम्ही सांगायची गरज नाही. शिवसेनेने आपला स्वाभिमान केव्हाच गमावला असून थोडा जरी स्वाभिमान तुमच्यात शिल्लक असेल तर सत्तेतून बाहेर पडा. सरकारमध्ये राहून निर्णय घेण्याची क्षमता शिवसेनेत नाही. ‘जुमलेबाज सरकार’ म्हणणारा शिवसेना पक्ष हाच मोठा ‘जुमला’ असून, सत्तेत राहून शिवसेनेचं केवळ मलिदा खाण्याचं काम सुरु आहे. विरोधी पक्षांना सल्ला देण्यापूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकदा आपल्या फसव्या भूमिकेबद्दल आत्मचिंतन करावे. सरकारवर टीका करायची, मग मांडवली करायची, सत्तेचा मलिदा खायचा आणि पुन्हा त्याच सरकारवर टीका करायची. अशी शिवसेनेचे अवस्था झाली आहे. सरकारमध्ये राहून निर्णय घेण्याची क्षमता शिवसेनेत नाही. ‘जुमलेबाज सरकार’ म्हणणारा शिवसेना पक्ष हाच मोठा ‘जुमला’ असून, सत्तेत राहून शिवसेनेचं केवळ मलिदा खाण्याचं काम सुरु आहे. या वर्षीचा “मोस्ट कन्फ्यूज्ड पॉलिटिशयन अॅवार्ड” उद्धव ठाकरे यांना दिला जावा, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.

राम मंदिरासाठी उद्धव अयोध्येला जाणार आहेत याबाबत बोलतानाही विखे यांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला. आज उद्धव यांच्यावर केवळ राजकीय अस्तित्वासाठी ‘जय श्रीराम’ म्हणण्याची वेळ आली आहे, असे नमूद करताना जनतेच्या प्रश्नांबाबत प्रामाणिक असाल तर अयोध्येला जाण्याची नौटंकी करण्याऐवजी आजच सत्तेतून बाहेर पडून दाखवा, असे आव्हान विखेंनी दिले. याशिवाय घराणेशाहीबाबत बोलताना, राजकारणी घराण्यातील पीढी सक्षम असेल तर जनता स्वीकारते, असं मतही त्यांनी घराणेशाहीबाबत व्यक्त केलं.