नालासोपारातून अटक झालेल्या संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने जालन्यातून श्रीकांत पांगारकरला अटक करण्यात आली. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली असून श्रीकांत पांगारकरवरील कारवाईने जालना व औरंगादाबमध्ये खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही पांगारकरच्या अटकेमुळे धक्का बसला असून पांगारकरकडून असे काही घडेल असे वाटले नव्हते, असे पदाधिकारी सांगतात.

जालन्यातील श्रीकांत पांगारकर हा शिवसेनेचा माजी नगरसेवक असला तरी त्याचे वडील जगन्नाथ पांगारकर हे भाजपाचे माजी नगरसेवक होते. भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जायचे. साधारणत: २० ते २५ वर्षांपूर्वी जालन्यात शिवसेनेचा जोमात होती. त्यावेळी जगन्नाथ पांगारकर यांचा मुलगा श्रीकांतने शिवसेनेत प्रवेश केला. जालन्यात पांगारकर यांचे स्वस्त दरात धान्य व रॉकेलचा व्यवसाय होता. २००१ ते २०१० अशी सलग १० वर्षे तो शिवसेनेचा नगरसेवक होता. २०११ मध्ये त्याने शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली.

Hatkanangale lok sabha constituency, 2024 election, sugar mill owners, farmers leader raju shetti
हातकणंगलेत पुन्हा एकदा साखर कारखानदार – शेतकरी नेत्यात लढत
Sanjay Raut, Raju Shetty
…तर संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आले असते का ?राजू शेट्टी यांचा प्रतिप्रश्न
Congress Kolhapur
काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले
loksatta chavadi maharashtra politics maharashtra political crisis 
चावडी: शुक्राचार्य कोण ?

शिवसेनेतून बाहेर पडल्यावर पांगारकर हिंदू जनजागृती समितीचा पदाधिकारी म्हणून काम करु लागला. पांगारकर विवाहित असून दोन वर्षांपूर्वी तो आई, पत्नी आणि मुलींसह औरंगाबादमध्ये स्थायिक झाला. पांगारकरची मुलगी अकरावीत शिकते. मुलीच्या शिक्षणासाठीच ते जालन्यातून औरंगाबादला आले, असे समजते. औरंगाबादमधील गारखेडा परिसरात पांगारकर कुटुंबिय वास्तव्यास आहे. जालन्यात पांगारकरचे अंबड चौफुली येथील महसूल कॉलनीजवळ निवासस्थान आहे. त्याच्या घरातील संरक्षक भिंतीजवळ पोलिसांना एक जुनी जळालेली दुचाकी आढळल्याचे सूत्रांकडून समजते. ही दुचाकी कशी जळाली याचाही पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी पांगारकर याच्या घराचीही झाडाझडती घेतली.

पांगारकर हा कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेचा होता.  तसेच हिंदुत्ववादी संघटनेत काम करताना तो केदारनाथमधील जलप्रलयानंतर तिथे मदतकार्यासाठी देखील गेला होता, असे समजते.