01 December 2020

News Flash

अपघात रोखण्यासाठी जनावरांच्या शिंगांना रेडियम

चिंचोटी-भिवंडी राज्य मार्गावर उपक्रम

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मोकाट जनावरांच्या शिंगाना रेडियम लावण्यात आल्या.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग, चिंचोटी-भिवंडी राज्य मार्गावर उपक्रम

लोकसत्ता वार्ताहर

वसई: वसईत विविध ठिकाणच्या रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. यामुळे रात्रीच्या वेळेस ही जनावरे वाहनचालकांना दिसत नसल्याने अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. या घटना रोखण्यासाठी पशुप्रेमींकडून मोकाट जनावरांच्या शिंगावर रेडियमचे पट्टे मारण्यात आले आहेत.

मागील काही महिन्यांपासून मोकाट जनावरांनी आपला मोर्चा थेट विविध ठिकाणच्या मुख्य रस्त्यावर वळविला आहे.  मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग, चिंचोटी-भिवंडी राज्य मार्ग तसेच वसई-विरार शहराला जोडणाऱ्या विविध मुख्य रस्त्यांवर  मोकाट जनावरे मुक्तपणे संचार करतानाचे चित्र दिसून आले आहे. वसईच्या पूर्वेतील ससूनवघर, मालजीपाडा, चिंचोटी,पेल्हार, भालीवली, सकवार यासह इतर भागांतील मुख्य मार्गावर ही जनावरे मोकाट फिरत असतात. मोकाट जनावरे ही चाऱ्याच्या शोधात मुख्य रस्त्यावर येऊ लागली आहेत. महामार्गाच्या कडेला व महामार्गाच्या दुभाजकामध्ये गवत उगवले आहे ते खाण्यासाठी अनेक जनावरे रस्ता ओलांडून जात असतात. कधी कधी ही जनावरे महामार्गावरील असलेल्या दुभाजकांच्या मध्ये उगवलेले गवत खाण्यासाठी रस्त्याच्या मध्ये येत असतात. यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना आपल्या वाहनांचा वेग पटकन नियंत्रणात आणता येत नाही. यामुळे अपघात होऊन वाहनांचे नुकसान होत असून वाहनचालकांनाही आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे. काही वेळा अपघातात जनावरांचाही मृत्यू होतो.

यासाठी जनावरांच्या शिंगांना जर रेडियमचे पट्टे असतील तर लांबून ही जनावरे निदर्शनास येतील, यामुळे  जनावरे व वाहनचालकांचे होणारे अपघात रोखण्यास मदत होणार आहे. यासाठी भूपेश पाटील व रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी द्रुतगती मार्गावरील  ढेकाळे, सकवार, खानिवडे टोलनाका व इतर ठिकाणच्या भागांत आढळून येणाऱ्या गाई, बैल यांच्या शिंगावर रेडीएम पट्टी लावली, जेणेकरून अंधारात येणाऱ्या वाहनचालकांना समोर गाय, बैल बसलेयत हे माहीत पडेल व होणाऱ्या अपघातांना आळा बसेल, असे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी सांगितले आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 2:15 am

Web Title: radium to animal horns to prevent accidents zws 70
Next Stories
1 पालघरमध्ये आता जिल्हा पक्ष्यांसाठी निवडणूक
2 पालिकेच्या पाणी करात तफावत
3 शहरबात : विनाशकारी गर्वगीत
Just Now!
X