19 September 2020

News Flash

Rafael Deal : ..तर शरद पवारांनी स्पष्टीकरण का दिलं नाही – तारिक अन्वरांचा प्रश्न

म्हणून राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला, तारिक अन्वर यांनी दिले स्पष्टीकरण

संग्रहित छायाचित्र

राफेल विमान व्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास होत असेल, तर त्यांनी याबाबत अद्याप स्पष्टीकरण का दिलं नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले खासदार तारिक अन्वर यांनी केला आहे. शरद पवार यांनी राफेल विमान व्यवहारप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बाजू घेतल्याने नाराज झालेल्या अन्वर यांनी काल शुक्रवारी अचानक राजीनामा दिला.

शरद पवार यांनी केलेल्य वक्तव्याचा निष्कर्ष काढल्यास त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतल्याचे दिसून येते. राफेल विमान व्यवहारप्रकरणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिला आहे. सर्व बाजूंनी पंतप्रधानांवर राफेल विमान व्यवहारप्रकरणी आरोप होत आहेत. आणि पवार यांनी याप्रकरणी पंतप्रधानांवर संशय नाही असे म्हटलेय. तर या प्रकरणी जो रोष आहे तो निरर्थक असल्याचं वाटतं, असं म्हणत तारिक अन्वर यांनी नाराजी व्यक्त केली.

(आणखी वाचा : राफेलच्या किंमती जाहीर करण्यास धोका नाही, बोफोर्सवेळी भाजपानेही हीच मागणी केली होती: शरद पवार )

शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत. जर त्यांनी एखादे वक्तव्य केले म्हणजे ती पक्षाची भूमिका असते. असं वाटतं त्यामुळे राजीनामा दिला, असं तारिक अन्वर म्हणाले. वक्तव्याचा विपर्यास केला असं वाटत असतं तर शरद पवारांनी तेव्हाच स्पष्टीकरण द्यायला हवं होतं. या सर्व बातम्या पाहिल्यानंतर मी २४ तास वाट पाहिली, कारण पवार साहेब स्पष्टीकरण देतील, असं वाटलं होतं. पण त्यांचं कोणतंही स्पष्टीकरण आलं नाही. त्यानंतर राजीनाम्याचा निर्णय घ्यावा लागला, असं तारिक अन्वर म्हणाले.

(आणखी वाचा : शरद पवारांना धक्का, तारिक अन्वर यांची राष्ट्रवादीला सोडचिट्ठी)

सर्व विरोधक राफेलप्रकरणी एकजूट झाले आहेत, सर्वांना वाटतं की या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे. पण पवारांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांच्या आंदोलनाचं नुकसान झाल्याचं मत तारिक अन्वर यांनी यावेळी व्यक्त केलं.

काय म्हणाले होते शरद पवार..

लोकांना नरेंद्र मोदींच्या उद्देशावर शंका नसल्याचे पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले होते. हा काँग्रेस नेत्यांच्या नाही तर निर्णय घेताना त्यात सहभागी झालेल्यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. लोकांना काय वाटते याचा आहे. लोकांना मोदींच्या उद्देशावर शंका नाही. सुरुवातीला निर्मला सीतारमन माहिती देत होत्या. आता अरुण जेटलींनी त्यांची जागा घेतली आहे. करारातील महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली नाही असे दिसत आहे. ज्याप्रकारे माहिती सादर करण्यात आली त्यावरुन शंका उपस्थित झाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2018 12:47 pm

Web Title: rafael deal why sharad pawar didnt clerificati on rafale deal says tariq anwar
Next Stories
1 हसीन जहाँपासून मला धोका, मोहम्मद शमीने केली सुरक्षारक्षकाची मागणी
2 आयफोनच्या लॉन्चिगनंतर घरी परतणाऱ्या मॅनेजरचा पोलिसाच्या गोळीबारात मृत्यू
3 मोदी सरकारविरोधात अण्णा हजारे मैदानात, गांधी जयंतीपासून करणार आंदोलन
Just Now!
X