News Flash

राफेल प्रकरण : फ्रान्समधील चौकशीतून “चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झाले – नाना पटोले

या खरेदी कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी केल्यास सत्य समोर येऊन खरे चोर सापडतील, असं देखील म्हणाले आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. (संग्रहित छायाचित्र)

राफेल लढाऊ विमान खरेदीत प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उघड केले होते. मात्र सातत्याने खोटे बोलून व खोटी कागदपत्रे दाखवून केंद्र सरकारने या घोटाळ्यावर पांघरून घालण्याचे काम केले होते. मात्र राफेल लढाऊ विमान खरेदी करारानंतर डसॉल्ट कंपनीने भारतीय मध्यस्थाला एक दशलक्ष युरोंची लाच दिल्याचे फ्रान्समध्ये सुरु असलेल्या चौकशीतून समोर आले असून, यातून “चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झाले आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

राफेल प्रकरण : “भारतीय मध्यस्थाला देण्यात आलं होतं कोट्यावधीचं गिफ्ट”

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारत आणि फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत २०१६ मध्ये करार झाला. त्यानंतर डसॉल्टने भारतातील मध्यस्थाला एक दशलक्ष युरो एवढी रक्कम दिली. २०१७ मध्ये डसॉल्ट ग्रुपच्या बँक खात्यातून ‘गिफ्ट टू क्लाएंट’ म्हणून ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती. फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था AFA ने डसॉल्टच्या बँक खात्यांचे ऑडिट केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. यावरून राफेल खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे.

तसेच, राहुल गांधी व काँग्रेस पक्षाने सातत्याने मागणी केल्याप्रमाणे या खरेदी कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी केल्यास या प्रकरणाचे सत्य समोर येऊन खरे चोर सापडतील असं देखील नाना पटोले म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 4:32 pm

Web Title: rafale case inquiry in france proves chowkidar hi chor hai nana patole msr 87
Next Stories
1 देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदी ‘या’ नेत्याची लागणार वर्णी
2 “वेदनादायी….’आबां’नंतर मंत्रिमंडळात आदर्श गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले, पण…”
3 “खोटं पडल्यानंतर शरद पवारांनी बोलणंच बंद केलं,” गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
Just Now!
X