महाडजवळ सावित्री नदीवरील पूल कोसळल्यामुळे बेपत्ता झालेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या शोध मोहिमेतील एक राफ्टिंग बोट गुरुवारी सकाळी उलटली. या बोटीतील सर्व जवानांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. सावित्री नदीत पडलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी गुरुवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. त्यावेळी शोधकार्यासाठी नदीत उतरविण्यात आलेली राफ्टिंग बोट उलटली. या बोटीवर पाच जवान होते. पण लगेचच इतर राफ्टिंग बोटींच्या साह्याने इतर जवानांनी या बोटीतील जवानांना नदीतून बाहेर काढले.
मुंबई-गोवा महामार्गावर राजेवाडी फाट्याजवळील जुना पूल मंगळवारी रात्री कोसळला. या दुर्घटनेमुळे दोन एसटी बससह पाच ते सात वाहने सावित्री नदीत बुडाली. नदी बुडालेल्या वाहनांचा आणि प्रवाशांचा बुधवारी सकाळपासून शोध घेण्यात येतो आहे. त्यासाठी एनडीआरएफची चार पथके, त्याचबरोबर तटरक्षक दलाचे जवान घटनास्थळी कार्यरत आहेत. शोधमोहिमेत बुधवारी दोन मृतदेह सापडले होते. त्याचबरोबर गुरुवारी सकाळी एका पुरुषाचा आणि एका महिलेचा मृतदेह आंजर्ले आणि हरिहरेश्वर येथे आढळून आला. या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. बुधवारी संध्याकाळी शोधकार्य अंधारामुळे थांबविण्यात आले होते. गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा शोधकार्य सुरू करण्यात आले. त्याचवेळी राफ्टिंग बोट पाण्यात उलटल्याची दुर्घटना घडली. पण इतर जवानांनी पाण्यात पडलेल्या पाच जवानांना लगेचच बाहेर काढले.

फोटो गॅलरी:  सावित्री नदीत शोधकार्यातील राफ्टिंग बोट उलटली

accident, Mumbai Nashik highway,
मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…
Nagpur Holi
नागपुरात होळीत मद्यपींचा रस्त्यावर हैदोस; दोघांचा मृत्यू, शंभरावर…
kolhapur marathi news, shaktipeeth expressway marathi news, shaktipeeth expressway kolhapur marathi news
शक्तिपीठ महामार्गाविषयी कोल्हापुरात मंगळवारी जनसुनावणी; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर दखल