08 July 2020

News Flash

Uddhav Thackeray Birthday :राहुल गांधींकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Uddhav Thackeray Birthday : उद्धव ठाकरेंशी जवळीक करण्याचा राहुल गांधी प्रयत्न करत असल्याची शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहे

Uddhav Thackeray Birthday : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ५८ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांना अनेकजण शुभेच्छा देत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील ट्विट करत उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘उद्धव ठाकरे यांना उत्तम आरोग्य आणि आनंद मिळो’.

राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उघडपणे भाजपा आणि नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंशी जवळीक करण्याचा राहुल गांधी प्रयत्न करत असल्याची शंकाही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत असते. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणतेही फलक, होर्डिंग लावू नका असं सांगत पर्यावरण जपण्याचं आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2018 11:14 am

Web Title: rahul gandhi birthday wish to uddhav thackeray
टॅग Uddhav Thackeray
Next Stories
1 #AbdulKalam: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे दहा स्फूर्तिदायक विचार!
2 ‘मी गृहमंत्री असतो तर बुद्धिजीवींना गोळ्या घालण्याचा आदेश दिला असता’
3 अबू सालेम ‘संजू’ला कोर्टात खेचणार
Just Now!
X