23 September 2020

News Flash

राहुल गांधी बालीश -उमा भारती

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाकडे फारसे गांभीर्याने बघत नाही.

| April 23, 2015 01:57 am

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाकडे फारसे गांभीर्याने बघत नाही. तो सध्या बालीश असल्यामुळे त्याच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा सोनिया गांधी किंवा मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या विधानावर प्रतिक्रिया देणे उचित होईल, असे मत जलस्रोत व नदी विकास मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केले. खासगी कार्यक्रमासाठी त्या नागपुरात आल्या असता पत्रकारांशी बोलत होत्या.
 राहुल गांधी यांनी कुठलीही टीका करण्यापेक्षा विकासाचे राजकारण समजून घेण्याची गरज आहे. तो सध्या बालीश असल्यामुळे त्याला काय बोलावे ते कळत नाही. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपवर किंवा केंद्र सरकारच्या योजनांवर टीका केली तर त्यांना उत्तर देऊ. मात्र, राहुल गांधी यांच्या विधानावर प्रतिक्रिया देणे उचित होणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 1:57 am

Web Title: rahul gandhi childish uma bharti
टॅग Rahul Gandhi
Next Stories
1 नरेंद्र मोदी माझे नेते -संजय जोशी
2 औरंगाबादमध्ये ६२ टक्के मतदान
3 राज्यात रासायनिक खतांचा वाढता वापर
Just Now!
X