25 October 2020

News Flash

रायगड : चोवीस तासांत करोनाचे ६७ नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

करोना बाधितांचा आकडा १११७ वर

प्रतिकात्मक छायाचित्र

रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ६७ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २७ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा १११७ वर पोहोचला आहे. तर रविवारी उपचारा दरम्यान तिघांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात ६७ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील ३०, पनवेल ग्रामिण मधील १०, उरण मधील ३, कर्जत १,  अलिबाग १, मुरुड ४, माणगाव २, तळा ४, रोहा १, म्हसळा १०, महाड मधील १ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात महाड, म्हसळा आणि अलिबाग येथील रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात २७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील ३८०२ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील २५६६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. १११७ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर ११९ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. ६१६ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या ४५१ करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १८९, पनवेल ग्रामिण हद्दीतील ६३, उरण मधील २३,  खालापूर ७, कर्जत २२, पेण ९, अलिबाग २९,  मुरुड १३, माणगाव ३४, तळा येथील ७, रोहा १९, सुधागड १, श्रीवर्धन ४, म्हसळा १७, महाड १, पोलादपूर मधील १२ करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्ता पर्यंत ५० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले ३२ हजार ७१८ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 9:55 pm

Web Title: raigad 67 new patients of corona in 24 hours three died msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 सोलापूर : दिवसभरात ८४ नवे करोनाबाधित रुग्ण, पाच वृध्दांचा मृत्यू
2 महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान काही जणं करतात हे दु:खदायक – उद्धव ठाकरे
3 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले भाजपाच्या मंत्र्यांचे आभार
Just Now!
X