रायगड जिल्ह्यात करोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण ९० टक्कय़ांवर पोहोचले आहे. पण सोमवारी दिवसभरात तब्बल ३० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ४६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्यात २१० नवे रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात ४३७ रुग्ण बरे झाले.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता ४८ हजार ५५६ वर पोहोचली आहे.

यापैकी ४३ हजार ५०५ जण करोनातून पूर्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या ३ हजार ६७८ करोनाचे अ‍ॅक्टीव रुग्ण आहेत. तर १३७३ जणांचा आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात २१० करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. यात पनवेल मनपा हद्दीत १२१, पनवेल ग्रामिण ३३, उरण ३, खालापूर ९, कर्जत १, पेण १४, अलिबाग १७, मुरुड ५, माणगाव १, रोहा ५, श्रीवर्धन १ रुग्ण आढळून आले.

तर तळा, सुधागड,  म्हसळा, महाड, पोलादपूर येथे एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात सध्या ३ हजार ६७८ करोनाचे रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ७४८,  पनवेल ग्रामिण ६०७, उरण १५४, खालापूर १६३, कर्जत ८२, पेण १८१, अलिबाग ३१५, मुरुड २७, माणगाव ८४, तळा ८, रोहा १५७, सुधागड २८, श्रीवर्धन १७, म्हसळा ७, महाड ६९, पोलादपूर येथील २९ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के आहे, तर मृत्यूदर ३ टक्के आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३२.३ आहे. २ हजार ५०३ जणांवर गृहविलगिकरणात उपचार सुरु आहेत. २६६ रुग्णांना प्राणवायू द्यावा लागत असून तर ४६ जण कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे.