आरोग्य, विज्ञान, बीव्हीएससी अ‍ॅण्ड एच, अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाची सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) गुरुवारी सुरळीत पार पडली. रायगड जिल्ह्य़ात २० केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.

रायगड जिल्ह्य़ात जा.र.ह. कन्याशाळा व कनिष्ठ महाविद्यालय, अलिबाग, को.ए.सो.जनरल अरुणकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज, अलिबाग, जे.एस.एम. कॉलेज, अलिबाग, अ‍ॅड्. दत्ता पाटील लॉ कॉलेज, सी.एच. केळूसकर होमिओपॅथिक कॉलेज, अलिबाग, चिंतामणराव केळकर विद्यालय रेवदंडा बायपास रोड, अलिबाग, जि. रायगड, सेंट मेरी कॉन्हेंन्ट स्कूल, चेंढरे, अलिबाग, आर.सी.एफ. सेकंडरी व हायर सेकंडरी विद्यालय कुरूळ अलिबाग, को.ए.सो. रामभाऊ पाटील हायस्कूल बामणगांव, ता. अलिबाग, प्रभाकर नारायण पाटील बी.एड.कॉलेज वेश्वी ता. अलिबाग, प्रभाकर नारायण पाटील हायस्कूल, वेश्वी, ता. अलिबाग जि. रायगड, स.म.वडके विद्यालय,चोंढी-किहीम, ता.अलिबाग, को.ए.सो. ना.ना.पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेअलिबाग, प्रतिनिधीज पोयनाड, ता. अलिबाग, पेण एज्युकेशन सोसायटीचे प्रायव्हेट हायस्कूल, पेण, एम.एन.नेने कन्या विद्यालय, पेण, जि.रायगड., सार्वजनिक विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज, पेण, पी.एस.एम.एस. इंग्लिश मीडियम स्कूल, पेण, डॉ. पतंगराव कदम कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्स पेण, कारमेल स्कूल, पेण, देवनागरी सोसायटी पेण, लिटिल अँगल स्कूल, पेण, मुंबई-गोवा हायवे रोड, झी गार्डन जवळ या केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या सर्व परीक्षा केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जिल्ह्य़ात सर्व परीक्षा केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार न घडता परीक्षा शांततेत व सुरळीत पार पडली. अलिबागजवळील काल्रेिखड येथे सकाळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. सर्व विद्यार्थी वेळेत परीक्षा केंद्रांवर पोहोचले, अशी माहिती रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी दिली.