स्पध्रेच्या कार्यक्रमात बदल

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या खुल्या गटाची जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी क्रिकेट स्पध्रेच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या नियोजनानुसार ही १ मार्चपासून सुरू होणार होती. नवीन कार्यक्रमानुसार ही स्पर्धा मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात सुरू होणार आहे. या स्पध्रेतील खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करून रायगड संघ निवडण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली.

ही स्पर्धा ‘अ’, ‘ब’, ‘क’ अशा तीन गटांत खेळवली जाणार आहे. स्पध्रेतील सामने ४५ षटकांचे असतील. ‘अ’ व ‘ब’ गटांसाठी ५००० रुपये, तर ‘क’ गटासाठी ४००० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. स्पध्रेत प्रवेश नोंदविण्याची अंतिम तारीख १० मार्च आहे.

अधिक माहितीसाठी चंद्रकांत मते- ९८२२८३६४४२, प्रकाश पावसकर- ९४२३३७७६४६, अनिरुद्ध पाटील- ९०२१६५६५५५, जयंत नाईक- ९५६१०९९७३५, विवेक बहुतुले- ९४२११५८३०० यांच्याशी संपर्क साधावा.