रायगडमधील बोर्ली समुद्रात गुरुवारी सकाळी मच्छीमार बोट बुडाली असून बोटीतील सात पैकी सहा खलाशांना वाचवण्यात यश आले आहे. तर एक खलाशी बेपत्ता असून तटरक्षक दलाकडून त्याचा शोध सुरु आहे.

मुरुड तालुक्यातील सहा मच्छीमार बोर्ली समुद्रात मासेमारीसाठी गेले. पावसाळ्यात मासेमारीवर बंदी असूनही ते समुद्रात गेले होते. खवळलेला समुद्र आणि वादळी वाऱ्यामुळे बोट बुडाली. बोटीतील सात पैकी सहा खलाशांना वाचवण्यात यश आले. तर एका खलाशाचा शोध सुरु आहे. गणेश डोम्बे असे या खलाशाचे नाव आहे.

दरम्यान, रायगड, कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारपर्यंत झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या पाच वर्षांची सरासरी पावसाने मोडीत काढली आहे.