रायगड जिल्ह्यातील लॉकडाउन नियोजित वेळेआधीच म्हणजे दोन दिवस आधीच हटवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, २४ जुलैच्या मध्यरात्रीपासूनच लॉकडाउन हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत. यामुळे आजपासून रायगड जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येणार आहे.

लॉकडाउन केल्यानंतरही करोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होतच आहे. तसेच जिल्ह्यातील व्यापारी, डॉक्टर्स, व्यवसायिकांच्या विविध संघटनांनी लॉकडाउनला विरोध केला आहे. समाजातील विविध घटकांकडून लॉकडाउनला होत असलेला विरोध लक्षात घेता नियोजित वेळेच्या आधीच म्हणजे दोन दिवस आधीच लॉकडाउन हटवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

जिल्ह्यात १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. हा लॉकडाउन २६ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत दहा दिवसांसाठी असणार होता. मात्र, नागरिकांचा आणि व्यापाऱ्यांचा याला होत असलेला तीव्र विरोध पाहता दोन दिवस आधीच म्हणजेच २४ जुलैच्या मध्यरात्रीपासूनच लॉकडाउन हटवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामुळे आजपासून रायगड जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येणार आहे.